शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

इंग्लंडच्या आशा कायम

By admin | Published: March 24, 2016 1:34 AM

मोईन अलीच्या नाबाद ४१ धावा पाठोपाठ गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्याच्या बळावर इंग्लंडला टी-२० विश्वचषकात विजयाची संजीवनी मिळाली.

नवी दिल्ली : मोईन अलीच्या नाबाद ४१ धावा पाठोपाठ गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्याच्या बळावर इंग्लंडला टी-२० विश्वचषकात विजयाची संजीवनी मिळाली. बुधवारी येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानचा कडवा प्रतिकार मोडून काढून १५ धावांनी विजयाची चव चाखली. या विजयानंतर संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. सुरुवातीला झालेल्या पडझडीतून सावरून इंग्लंडने ७ बाद १४२ पर्यंत आव्हानातमक मजल गाठली. नंतर अफगाण संघाला ९ बाद १२७ धावांत रोखून सामना जिंकला. इंग्लंडचा तीन सामन्यातील हा दुसरा विजय आहे. अफगाणिस्तान सलग तीन पराभवानंतर स्पर्धेबाहेर पडला. अफगाणच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या माऱ्यापुढे धैर्य दाखविले असते तर विजय सोपा झाला असता. अफगाणिस्तानने गेल्या दोन सामन्यात १५० वर धावा केल्या. शिवाय द. आफ्रिकेविरुद्ध त्यांनी १७२ चा आकडा गाठला होता. या सामन्यात मात्र त्यांचा अर्धा संघ केवळ ३९ धावांत परतला. मोहम्मद शहजाद ४, कर्णधार असगर स्टानेकजई १, गुलबदिन नायब शून्य हे झटपट परतले. राशिद खान १५ आणि नूर अली १७ धावांवर नाबाद राहीला.तळाचे समीउल्ला शेनवारी याने २७ चेंडूत २२, दौलत जादरानने दहा चेंडूत १४ आणि शफिकउल्लाह सदक याने २० चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३५ धावा ठोकून सामना रोमहर्षक स्थितीत आणला होता. पण आघाडीच्या फळीची हाराकिरी अफगाणला महागात पडली. विली, रशिदने प्रत्येकी दोन तर जॉर्डन, मोईन व स्टोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.(वृत्तसंस्था)धावफलकइंग्लंड :- जेसन रॉय त्रि. गो. हमजा ०५, जेम्स विस झे. व गो. नबी २२, जो रुट धावाबद १२, इयोन मॉर्गन त्रि. गो. नबी ००, बेन स्टोक्स त्रि. गो. रशिद ०७, जोस बटलर झे. नबी गो. शेनवारी ०६, मोईन अली नाबाद ४१, ख्रिस जॉर्डन झे. व गो. राशिद १५, डेव्हिड विली नाबाद २०. अवांतर (१४). एकूण २० षटकांत ७ बाद १४२. बाद क्रम : १-१६, २-४२, ३-४२, ४-४२, ५-५०, ६-५७, ७-८५. गोलंदाजी : अमिर हमजा ४-०-४५-१, शापूर जॉर्डन ४-०-३४-०, मोहम्मद नबी ४-०-१७-२, समीउल्ला शेनवारी ४-०-२३-१, राशिद खान ४-०-१७-२.अफगाणिस्तान :-मोहम्मद शहजाद पायचित गो. विली ०४, नुरअली जादरान झे. व गो. राशिद १७, असगर स्टॅनिकजई झे. रुट गो. जादरान ०१, गुल्वादिन नायब झे. स्टोक्स गो. विली ००, राशिद खान झे. मोर्गन गो. अली १५, मोहम्मद नबी झे. जॉर्डन गो. राशिद १२, समीउल्ला शेनवारी झे. रुट गो. स्टोक्स २२, नजीबुल्ला जादरान धावबाद १४, शफीकउल्ला नाबाद ३५, आमिर हमजा अली धावबाद ०१, शापूर जादरान नाबाद ००. अवांतर (६). एकूण २० षटकांत ९ बाद १२७. बाद क्रम : १-४, २-१२, ३-१३, ४-३५, ५-३९, ६-६४, ७-८५, ८-९४, ९-१०८. गोलंदाजी : विली ४-०-२३-२, जॉर्डन ४-०-२७-१, प्लंकेट ४-१-१२-०, अली २-०-१७-१, राशिद ३-०-१८-२, स्टोक्स ३-०-२८-१.