ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० वर्ल्डकपमधील दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने शेवटच्या टप्प्यात शानदार खेऴी करत विजय मिऴविला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने केलेल्या २२९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने शेवटच्या टप्प्यात फलंदाज ज्यो रुटने केलेल्या शानदार फलंदाजीमुऴे सामना फिरवला आणि दोन गडी राखून विजय मिऴविला. इंग्लंडने १९.४ षटकात आठ बाद २३० धावा केल्या. आत्तापर्यंत झालेल्या टी-२० वर्ल्डकमधील सामन्यांमध्ये इंग्लंडने केलेली धावसंख्या सर्वाधिक जास्त असल्याची नोंद झाली आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय गृहीत धरला जात होता, कारण याआधी वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यांत आफ्रिकन्स्ने धावांचा पाऊस पाडला असल्याने त्यांच्या फलंदाजांसाठी येथील खेळपट्टी चांगलीच ओळखीची झाल्याचे बोलले जात होते. मात्र शेवटच्या षटकांमध्ये इंग्लंडने सामना फिरवला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात ज्यो रुटने सर्वाधिक जास्त धावा केला. ज्या रुटने ४४ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकार लगावत ८३ धावा केल्या. जेसन रॉय (४३), अॅलेक्स हेल्स(१७), बेन स्टोक्स (१५) जोस बटलरने २१ धावा केल्या.
तर, दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाज हाशिम आमलाने सर्वाधिक अर्धशतकी खेळी केली. आमलाने ३१ चेंडूत ५८ धावा केल्या.