- हर्ष भोगले लिहितो..बंगळुरू कसोटीदरम्यान निर्माण झालेला वाद मिटल्यामुळे आनंद झाला. दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा दाखवल्यामुळे पुन्हा एकदा मैदानावरील खेळाचा आनंद घेता येईल. हा वाद मिटणे अधिक महत्त्वाचे होते. आॅस्ट्रेलियन खेळाडू डीआरएस घेताना नियमित मदत घेत होते, ही बाब विराट कोहलीने पंचांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्याला ते सिद्धही करता आले. पण, आता या वादात न पडता आगेकूच करण्याची गरज आहे. सन २००८मध्ये सिडनी येथे घडलेली घटना मी जवळून बघितली आहे. आपल्या क्रीडाक्षेत्रासाठी ही चांगली बाब नाही. आपल्या खेळाचे खरे सौंदर्य आश्विन स्मिथला आणि लियोन कोहलीला गोलंदाजी करीत असल्याचे बघताना आहे.बंगळुरूमध्ये भारताने लढवय्या खेळ करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. पिछाडीवर पडल्यानंतरही आम्ही मोठ्या फरकाने विजय मिळवू शकतो, हे भारताने दाखवून दिले. दोन्ही फिरकीपटंूनी सहा बळी घेण्याची कामगिरी केली असून, वेगवान गोलंदाज आपली भूमिका चोख बजावत आहेत. भारतीय संघात समतोल साधला गेला आहे. कर्णधाराने या मालिकेत अद्याप मोठी खेळी केलेली नाही. पण, त्याने द्विशतक झळकावण्यास बराच कालावधी झालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन कसोटी सामन्यांतील अपयशानंतर कोहलीवर टीका करण्याचे धाडस कुणी करणार नाही. भारत दौऱ्यावर असलेल्या आॅस्ट्रेलिया संघातील तीन खेळाडू महत्त्वाचे आहेत. त्यात वॉर्नरला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय उपखंडात कामगिरीत सातत्य राखण्यात तो अपयशी ठरत आहे. आशिया खंडाच्या बाहेर मात्र त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरते. त्याला लवकरच सूर गवसेल, अशी आशा आहे. दुसरा खेळाडू म्हणजे मिशेल स्टार्क. पण तो आता या मालिकेत खेळणार नाही. आॅस्ट्रेलिया संघासाठी हा मोठा धक्का आहे. नव्या व जुन्या चेंडूने परंपरागत व रिव्हर्स स्विंग मारा करण्यात सक्षम असलेला हा गोलंदाज मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकणार असल्यामुळे आॅस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. क्रिकेटसाठी स्टार्क महत्त्वाचा आहे. तो लवकरच फिट होईल, अशी आशा आहे.भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले असून, आॅस्ट्रेलिया संघाकडून रांचीमध्ये लढवय्या खेळ अपेक्षित आहे. (पीएमजी)
वाद मिटल्याचा आनंद...
By admin | Published: March 12, 2017 3:03 AM