शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

परफेक्ट ‘टेन’सह भारताची मालिकेत बरोबरी

By admin | Published: June 21, 2016 2:17 AM

भारताने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा १० गडी व ४१ चेंडू राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

हरारे : बरिंदर सरन (४-१०) व बुमराह (३-११) यांच्या भेदक माऱ्यानंतर मनदीप सिंग (नाबाद ५२ धावा, ४० चेंडू, ६ चौकार, १ षटकार) व के. एल. राहुल (नाबाद ४७ धावा, ४० चेंडू, २ चौकार, २ षटकार) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर भारताने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा १० गडी व ४१ चेंडू राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताने झिम्बाब्वेचा डाव ९ बाद ९९ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.१ षटकांत गडी न गमावता पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मनदीप व के. एल. राहुल यांनी सलामीला १०३ धावांची अभेद्य भागीदारी करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, वेगवान गोलंदाज बरिंदर सरन (१० धावांत ४ बळी) आणि जसप्रीत बुमराह (११ धावांत ३ बळी) यांच्या भेदक माऱ्यापुढे झिम्बाब्बेचा डाव ९ बाद ९९ धावांत रोखला गेला.पदार्पणाची लढत खेळणारा वेगवान गोलंदाज सरनने भारतातर्फे टी-२० क्रिकेटमध्ये दुसरी सर्वोत्तम कामगिरी करताना ४ षटकांत १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनच्या नावावर टी-२० मध्ये ८ धावांत ४ बळींची नोंद आहे. हा भारतीय विक्रम आहे. सरनने डावाच्या पाचव्या षटकात झिम्बाब्वेच्या तीन फलंदाजांना बाद केले. एकाच षटकात तीन फलंदाजांना बाद करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अशी कामगिरी अशोक डिंडाने केली आहे. सरनने या षटकात हेमिल्टन मस्कादजा (१०), सिकंदर रजा (१) आणि टीनोतेंदा मुतोमबोद््जी (०) यांना बाद केले. सरनने झिम्बाब्वेचा सलामीवीर चामू चिभाभा (१०) याला तिसऱ्या षटकात बाद केले होते. सरनने आघाडीच्या पाचपैकी चार फलंदाजांना माघारी परतवले. (वृत्तसंस्था) विजयाचे श्रेय गोलंदाजांना : धोनी

हरारे : कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोमवारी गोलंदाजांच्या कामगिरीवर खूश होता. गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने सोमवारी खेळलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यांत झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव केला. धोनी म्हणाला, ‘‘हा शानदार विजय आहे. गोलंदाजांनी विजयाची मजबूत पायाभरणी केली होती. आमच्यासाठी सुरुवात महत्त्वाची होती. गोलंदाजांनी अचूक मारा केला. या खेळपट्टीवर तिसरी लढत असल्यामुळे मला चिंता सतावत होती. आम्ही नाणेफेकीचा कौल मिळवला असता, तर फलंदाजी स्वीकारली असती. ’’तो पुढे म्हणाला, ‘‘गोलंदाजांच्या कामगिरीला क्षेत्ररक्षकांची योग्य साथ लाभली. टी-२० क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण चांगले होणे महत्त्वाचे असते.’’ १० धावांच्या मोबदल्यात चार बळी घेणारा सरन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सरन म्हणाला, ‘‘चेंडू स्विंग होत होता. कुठलेच दडपण नव्हते. मी वेगापेक्षा चेंडू स्विंग करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल होती.’’ पराभूत संघाचा कर्णधार क्रेमर म्हणाला, ‘‘आमची सुरुवात संथ झाली आणि मोक्याच्या क्षणी आम्ही विकेट गमावल्या. मालिकेत शानदार सुरुवातीनंतर हे निराशाजनक होते. खेळपट्टी थोडी वेगळी होती. केवळ ९९ धावा फटकाविल्यानंतर पराभव स्पष्ट दिसत होता. बुधवारी अंतिम लढत होणार असून, मालिका जिंकण्याची संधी आहे.’’ वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनी अनुक्रमे ३२ व १९ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी एक बळी घेतला. बुमराहने झिम्बाब्वेतर्फे सर्वाधिक ३१ धावा करणाऱ्या पीटर मूर याला १५ व्या षटकात माघारी परतवले. त्यानंतर १७ व्या षटकात एल्टन चिगुम्बुरा (८) व नेव्हिल मद््िजव्हा (१) यांना बोल्ड केले. कुलकर्णीने कर्णधार ग्रीम क्रेमर (४) व चहलने मॅल्कम वॉलरला (१४) तंबूचा मार्ग दाखवला. डोनाल्ड तिरिपानो ११ धावा काढून नाबाद राहिला. मूरने ३२ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व १ षटकार ठोकला. पहिला टी-२० सामना जिंकणाऱ्या झिम्बाब्वे संघाला सरनच्या एका षटकातील तीन धक्क्यानंतर सावरता आले नाही. त्यांचा डाव ९ बाद ९९ धावांत रोखल्या गेला. भारताचा ‘यॉर्कर मॅन’ बुमराहने चार षटकांत ११ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याने १७व्या षटकात दोन फलंदाजांना क्लीनबोल्ड केले. धावफलकझिम्बाब्वे :- सी. चिभाभा झे. रायडू गो. सरन १०, एच. मसाकाजा त्रि. गो. सरन १०, पी. मूर झे. पटेल गो. बुमराह ३१, एस. रजा झे. राहुल गो. सरन ०१, सी. मुतोम्बोजी पायचीत गो. सरन ००, एम. वालेर झे. पटेल गो. चहल १४, एल्टन चिगुम्बुरा त्रि.गो. बुमराह ०८, ए. क्रेमर झे. रायडू गो. कुलकर्णी ०४, एन. मेडजिव्हा त्रि. गो. बुमराह ०१, डी. तिरिपानो नाबाद ११, टी. मुजाराबानी नाबाद ००. अवांतर (९). एकूण २० षटकांत ९ बाद ९९. बाद क्रम : १-१४, २-२६, ३-२८, ४-२८, ५-५७, ६-७५, ७-८१, ८-८३, ९-९१. गोलंदाजी : सरन ४-०-१०-४, कुलकर्णी ४-०-३२-१, पटेल ४-०-२३-०, चहल ४-१-१९-१, बुमराह ४-०-११-३.भारत :- के. एल. राहुल नाबाद ४७, मनदीप नाबाद ५२. अवांतर (४). एकूण १३.१ षटकांत बिनबाद १०३. गोलंदाजी : तिरिपानो ३-०-११-०, मेडजिव्हा २.१-०-१९-०, मुजाराबानी २-०-१७-०, क्रेमर ३-०-२४-०, चिभाभा २-०-२३-०, रजा १-०-९-०.