शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

युरो चषक : रोनाल्डो विरुध्द बॅले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2016 8:47 PM

पहिल्या उपांत्य सामन्यात पोर्तुगाल भिडणार वेल्सशी लियोन : अंतिम टप्प्यात पोहचलेल्या युरो चषक २0१६ फुटबॉल स्पर्धेत बुधवारचा दिवस पोर्तुगाल आणि वेल्ससाठी ‘जीवन-मरणाचा’ प्रश्न घेवून उगवणार आ

रोनाल्डो विरुध्द बॅलेयुरो चषक : पहिल्या उपांत्य सामन्यात पोर्तुगाल भिडणार वेल्सशी लियोन : अंतिम टप्प्यात पोहचलेल्या युरो चषक २0१६ फुटबॉल स्पर्धेत बुधवारचा दिवस पोर्तुगाल आणि वेल्ससाठी ‘जीवन-मरणाचा’ प्रश्न घेवून उगवणार आहे, अंतिम फेरीच्या तिकीटासाठी हे दोन्ही संघ एकमेकांविरुध्द लढणार असले तरी या लढतीकडे रोनाल्डो विरुध्द बॅले असेच पाहिले जात आहे.स्टार खेळाडूंचा भरणा असलेला पोर्तुगालचा संघ सन २000 पासून आतापर्यत पाच पैकी चारवेळा सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. परंतु त्यांना चारपैकी तीन वेळा यापुढे मजल मारता आली नसल्याने यंदा ही प्रथा मोडीत काढण्याची संघाची मनिषा आहे. सन २00४ मध्ये त्यांनी यजमानपद भूषवताना फायनल गाठली परंतु ग्रीसने त्यांना हरवले होते. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात काही वेळा परिश्रमाने तर काही वेळा नशिबाने यशस्वी होऊ न पोर्तुगाल मोठ्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहचतो, परंतु हा टप्पा मात्र त्यांच्यासाठी संघर्षपूर्ण राहिला आहे. यामध्ये २00६ चा वर्ल्डकप आणि १९८४ च्या युरोकपची सेमीफायनलचा समावेश आहे. जवळ-जवळ ५८ वर्षांनी एखाद्या मोठया स्पर्धेची सेमीफायनल खेळत असलेल्या वेल्स संघाला इतिहास निर्माण करण्याची मोठी संधी आहे. या देशाला मोठा पल्ला गाठण्यास भलेही खूप कालावधी लागला असला तरी वेल्सचा विद्यमान संघ एक बलाढ्य संघ असून जबरदस्त फार्मात आहे. ख्रिस कोलमन यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने डार्क हॉर्सप्रमाणे स्पर्धेची सेमीफायनल गाठली होती. वेल्सने साखळी फेरीत स्लोव्हाकिया आणि रशिया संघांना हरवून गटात अव्वल स्थान मिळवले होते. राउंड-१६ मध्ये त्यांनी उत्तर आयर्लंडवर विजय मिळवला. या कामगिरीला आणखी चमकदार करताना वेल्सने उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमला हरवले. यामुळे पोर्तुगालला वेल्सविरुध्द अधिकच सतर्क रहावे लागेल. शिवाय त्यांना सुरवातीपासूनच आघाडी घ्यावी लागेल. कारण या स्पर्धेत त्यांनी कोणताही सामना ९0 मिनिटात जिंकलेला नाही. विशेष म्हणजे साखळी फेरीत त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. सगळे सामने बरोबरीत राहिले आहेत. नॉकआऊ टमध्ये त्यांनी क्रोएशियाला अतिरिक्त वेळेत तर उपांत्यफेरीत पोलंडवर पेनाल्टीमध्ये हरवले होते.चौकटया सामन्याला जगातील दोन महागड्या खेळाडूंमधील लढत म्हणून पाहिले जात होते. रियाल माद्रीद या एकाच क्लबकडून खेळणाऱ्या पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि वेल्सचा गेराथ बॅले यांच्यातील श्रेष्ठत्वाची परीक्षा पाहणारा हा सामना आहे. रोनाल्डो तिसऱ्यांदा युरोपियन चॅम्पियनशीपमध्ये खेळतो आहे, बॅलेची ही पहिलीच स्पर्धा असली तरी त्याने या स्पर्धेत जबरदस्त खेळ दाखवला आहे. रोनाल्डोनेही तीन गोल केले आहेत. क्लब सामन्यात नेहमी एकमेकांच्या साथीने खेळणारे हे दोन दिग्गज एकमेकांविरुध्द कसे खेळतात याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.