शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

युरो चषक - फ्रान्स अंतिम फेरीत

By admin | Published: July 08, 2016 2:18 AM

युरो चषक २0१६ फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रिजमनने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने जगज्जेत्या जर्मनीला २-0 गोलने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

मार्सेले : युरो चषक २0१६ फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रिजमनने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने जगज्जेत्या जर्मनीला २-0 गोलने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. २000 नंतर पहिल्यांदाच फ्रान्स युरो चषकाच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. सुरवातीची दहा मिनिटे यजमान फ्रान्सने दबदबा निर्माण केला, परंतु त्यानंतर रंगात आलेल्या जर्मनीने फ्रान्सच्या गोलपोस्टवर धडाधड आक्रमणे केली. चेंडू सतत फ्रान्सच्या गोलक्षेत्रात फिरत होता. सामन्यात चेंडूचे पझेशन जर्मनीकडे ६५ टक्के तर फ्रान्सकडे ३५ टक्के इतके होते. सामन्यात वर्चस्व जर्मनीचे असले तरी पुर्वार्ध संपता संपता फ्रान्सचे नशीब फळफळले. ग्रिजमनच्या कॉर्नरला हेडद्वारे ब्लॉक करताना जर्मनीचा कर्णधार श्वाईनटायगरचा हात चेंडूला लागला आणि पंचांनी फ्रान्सला पेनाल्टी बहाल केली. ग्रिजमनने या पेनाल्टीचे सोने केले. त्याने चेंडूला उजव्या कोपऱ्यातून गोलजाळीत धाडून फ्रान्सला १-0 असे आघाडीवर नेले. उत्तरार्धात खेळ संथ होत आहे असे वाटत असतानाच पोग्बाच्या ग्रिजमनने ७२ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. मैदानाच्या डाव्या कोपऱ्यात पोग्बाने पदलालित्याचा उत्कृष्ट नमुना दाखवत जर्मन खेळाडूला झुलवत गोलपोस्टच्या दिशेन फटका खेळला. हा चेंडू जर्मन गोलकिपर नेयुरने मोठ्या शिताफीने परतवला खरा, पण पुढे उभ्या असलेल्या ग्रिजमनने सहजपणे त्याला गोलजाळीची दिशा दाखवली. २-0 अशी आघाडी मिळाल्यामुळे स्टेडीयममध्ये उपस्थित यजमान संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साह पसरला तर खेळाडूंमध्ये चैतन्य संचारले. पिछाडीवर पडलेल्या जर्मन संघाने यानंतर आक्रमणाचा जोर वाढवला. मुलर, ओझील, गोत्झे यांनी अनेक चढाया केल्या, परंतु त्यांना गोल नोंदवण्यात अपयश आले. फ्रान्सचा गोलरक्षक हुगो लोरिसने चपळाईने ही आक्रमणे परतावून लावली. शेवटी ही लढत २-0 अशी जिंकून फ्रान्सने अंतिम फेरी गाठली. (वृत्तसंस्था)- या सामन्यापूर्वी जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील शेवटच्या पाच सामन्यापैकी एकाही सामन्यात फ्रान्सला विजय मिळालेला नाही.- या सामन्यात दोन गोल नोंदवणाऱ्या ग्रिजमनने स्पर्धेत एकूण सहा गोल नोंदवले आहेत.