शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 9:38 AM

Euro 2024 : जर्मनीच्या धरतीवर युरोपियन फुटबॉल क्लब चॅम्पियनशिपचा थरार. 

Euro Cup 2024 News In Marathi : युरोपियन फुटबॉल क्लब चॅम्पियनशिपच्या (European Football Club Championship) सतराव्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात यजमान जर्मनीने स्कॉटलंडविरूद्ध ५-१ असा मोठा विजय मिळवला. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री खेळवला गेला. जर्मनीकडून फ्लोरिअन विर्ट्झ, जमाल मुसियाला आणि काई हॅव्हर्ट्झ यांच्या पेनल्टीमुळे यजमानांनी हाफटाइमपूर्वी ३-० अशी मजबूत आघाडी घेऊन सामन्यावर नियंत्रण मिळवले. जर्मनीने सुरुवातीपासून सामन्यात आघाडी घेतल्याने स्कॉटलंडच्या अडचणी वाढल्या. खेळाडू खचल्याचे दिसले. याचाच फायदा घेत यजमानांनी मोठ्या विजयाकडे कूच केली. त्यात स्कॉटलंडच्या बचावपटूला ब्रेकच्या आधी रेड कार्ड मिळाले. (scotland vs germany euro 2024)

दुसऱ्या हाफमध्ये देखील यजमानांचे वर्चस्व कायम राहिले. निक्लस फ्युएलक्रग आणि एमरे कॅन यांनी आणखी दोन गोल करून सामना एकतर्फी केला अन् ५-० अशी आघाडी घेतली. पण, ८७व्या मिनिटाला अँटोनियो रुएडिगरच्या गोलमुळे स्कॉटलंडला खाते उघडण्यात यश आले. मात्र, हा गोल म्हणजे केवळ औपचारिकता होती. जर्मनीने २०१८ आणि २०२२ युरोपियन चॅम्पियनशिपमधील तसेच २०२१ च्या विश्वचषकातील आपले सुरुवातीचे सामने गमावले होते. मात्र, स्कॉटलंडविरूद्धच्या विजयामुळे यजमानांनी चांगली सुरुवात केली. अखेर जर्मनीने ५-१ असा विजय मिळवून विजयी सलामी दिली. 

 

दरम्यान, या स्पर्धेत २०२० च्या अंतिम सामन्यात इटलीने पेनल्टी शूटआऊटवर इंग्लंडचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला होता. त्यामुळे युरो कपच्या यंदाच्या पर्वात गतविजेत्या इटलीच्या संघावर सर्वांच्या नजरा असतील. यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना जर्मनी आणि स्कॉटलंड यांच्यात खेळवला गेला. स्कॉटलंडचा दारूण पराभव करून विजयी सलामी देण्यात जर्मनीला यश आले. या स्पर्धेत फक्त युरोपीय संघ भाग घेतात. फिफा विश्वचषकानंतरची ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. 

असा असणार फॉरमॅटसर्व २४ संघांची ६ गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात चार संघांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गटातील अव्वल २ संघ आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले सर्वोत्कृष्ट चार संघ १६ च्या फेरीसाठी पात्र ठरतील. १६ व्या फेरीतील विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील, त्यानंतर ते उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करतील. बाद फेरीत अर्थात 'करा किंवा मरा'च्या सामन्यात सामना पूर्ण वेळेत बरोबरीत राहिल्यास, अतिरिक्त वेळ (प्रत्येकी १५ मिनिटांचे दोन हाफ) खेळवले जातील. अतिरिक्त वेळेनंतरही सामना बरोबरीत राहिल्यास, सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे ठरवला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ जुलै रोजी आणि भारतीय वेळेनुसार १४ जुलैला खेळवला जाईल. 

टॅग्स :FootballफुटबॉलGermanyजर्मनी