ऑनलाइन लोकमतढाका , दि. 29 : १८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा दारुण पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. कर्णधार निलाम संजीप जेसच्या नेतृत्वात भारताने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. अंतिम सामन्यात शुक्रवारी भारताची लढत यजमान बांग्लादेशशी होणार आहे. भारताकडून शिवम आनंद, दिलप्रीत सिंग आणि कर्णधार निलाम संजीप जेसने प्रत्येकी एक गोल केला. तर पाकिस्तानकडून सामन्याच्या शेवटी अमजद अली खानने एकमात्र गोल केला. क्रिडामंत्री विजय गोयल यांनी भारतीय हॉकी संघांचे विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. आशिया चषक हॉकी स्पर्धेतील भारताची सुरवात अतिशय निराशजनक झाली होती. भारताला पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून ४-५ असे पराभूत व्हावे लागले. हा सामना स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक रोमांचक सामना ठरला. मात्र या पराभवातून सावरत भारतीय संघाने ओमानला११-० असे पराभूत करीत खाते उघडले. भारताने २००१ मध्ये विजेतेपद पटकावले होते; तर २००९ मध्ये भारताला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. भारतीय आघाडीपटू इबुंगो सिंग चार गोल केले आहेत. तर दिलप्रीत सिंग ने पाच गोल करत भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात महत्वपुर्ण योगदान दिले आहे. तर कर्णधार निलाम संजीप जेस व गोलरक्षक पंकज कुमार यांनीही आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.
इथेही भारताने पाकिस्तानवर केली मात
By admin | Published: September 29, 2016 7:28 PM