प्रस्थापितांना सोडून विस्तार केला जाऊ शकत नाही : आयसीसी
By admin | Published: March 28, 2015 1:43 AM
सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी प्रस्थापित सदस्यांना बाजूला ठेवून खेळाचा विस्तार केला जाऊ शकत नाही, असा इशारा देत चिंताही व्यक्त केली आहे.
सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी प्रस्थापित सदस्यांना बाजूला ठेवून खेळाचा विस्तार केला जाऊ शकत नाही, असा इशारा देत चिंताही व्यक्त केली आहे.रिचर्डसन यांनी सिडनीत गतचॅम्पियन भारतावरील ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर म्हटले, की आमच्या मंडळाच्या व्यूहरचनेत थोडा बदल करण्यात आला आहे. क्रिकेट खेळणार्या ४४ सदस्यांची संख्या १०६ पर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमच्याकडे पूर्ण सदस्य (कसोटी) देश आहेत. त्यातील झिम्बाब्वे हा एक आहे. कदाचित वेस्ट इंडिजही मागे राहू नये, यासाठी आम्हाला सावध राहावे लागेल.'रिचर्डसनने त्याचबरोबर इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये विश्वचषकातील संघांची संख्या १४ वरून १० करण्याचेही समर्थन केले आहे.रिचर्डसनने अमेरिकेत क्रिकेट खेळ स्थापित करण्याचे समर्थन केले. ते म्हणाले, की अमेरिका हे एक अशा देशाचे उदाहरण आहे. ज्यात खूप क्षमता आहे. अमेरिकेत झिम्बाब्वेपेक्षा अधिक खेळाडू क्रिकेट खेळत आहेत आणि हे न्यूझीलंडमध्ये खेळणार्या खेळाडूंच्या संख्येच्या जवळपास आहेत. जर यूएई विश्वचषकासाठी पात्र ठरू शकतो, तर अमेरिका असे करू शकत नाही, याचे कोणतेही कारण नाही. पुढील काही वर्षांत आमचे लक्ष त्यांच्यावरही असेल. (वृत्तसंस्था)================================================०००००