ऑनलाइन टीम
रियो दि जानेरो, दि. १४ - फूटबॉल वर्ल्डकपमधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ब्राझीलचे प्रशिक्षक फिलीप स्कॉलरी यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ब्राझीलला जर्मनीकडून १-७ असा मानहानीकारक पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर सर्व स्तरांतून स्कॉलरींवर टीका झाली होती. तर विश्वचषकातील तिस-या स्थानासाठीच्या झालेल्या सामन्यातही नेदरलँड्सने ब्राझीलचा ३-० असा पराभव केला. यामुळे स्कॉलरी यांच्यावर कारवाई होणे अटळ होते. अखेर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
स्कॉलरी यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने २००२ साली विश्वचषक पटकावला होता.