माँट्रियल - जर्मनीचा स्टार रेसर सेबेस्टियन वेट्टेलने कॅनडा ग्रां. प्री.मध्ये ग्रेट ब्रिटनच्या लुईस हॅमिल्टनचा दबदबा संपुष्टात आणत कारकिर्दीतील ५० वी फॉर्म्युला वन रेस जिंकली यासह ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये वेट्टेलने अव्वलस्थान पटकावले.फेरारीचा चारवेळचा चॅम्पियन असलेल्या वेट्टेल याने कारकिर्दीमध्ये ५४ व्यांदा पोल पोझिशनने सुरुवात केली़ वेट्टेलच्या वर्चस्वापुढे मर्सिडीजचा फिनलँडचा चालक वालटेरी बोटास याला द्वितीय, तर नेदरलँडचा रेडबूलचा चालक मॅक्स वेरस्टापेनला तृतीय स्थानी समाधान मानावे लागले. यंदा सात शर्यतीनंत वेट्टेल सर्वाधिक १२१ गुणांसह अव्वलस्थानी पोहोचला आहे़ यानंतर बलाढ्य हॅमिल्टनचा क्रमांक असून तो १२० गुणांसह द्वितीय स्थानी आहे. विशेष म्हणजे हॅमिल्टनने कॅनडा ग्रा.ं प्री. मध्ये गेली तीन वर्ष सलग जेतेपद पटकावले होते. मात्र, यावेळी वेट्टेलच्या धडाक्यापुढे त्याला आपला प्रभाव पाडता आला नाही.
एफ वन रेसिंग : वेट्टेलने झळकावले अर्धशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 5:48 AM