शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

पाकिस्तान-बांगलादेश समोरासमोर

By admin | Published: March 16, 2016 8:39 AM

मोठ्या वादंगानंतर भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानचा संघ बुधवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामीसाठी झुंजार बांगलादेशविरुद्ध लढेल. मैदानाबाहेरील घडामोडींमुळे

कोलकाता : मोठ्या वादंगानंतर भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानचा संघ बुधवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामीसाठी झुंजार बांगलादेशविरुद्ध लढेल. मैदानाबाहेरील घडामोडींमुळे सध्या खूप चर्चेचा विषय ठरलेल्या पाकिस्तानची कामगिरी प्रत्यक्षात मैदानात कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याच वेळी बांगलादेश सलामीलाच धक्कादायक निकाल नोंदवण्यात यशस्वी होतो की नाही, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणारे आहे.ईडन गार्डन येथे होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशविरुद्ध आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने खेळेल. तर, पाकिस्तानविरुद्ध जिंकल्याचा आत्मविश्वास घेऊन बांगलादेश पुन्हा एकदा धक्का देण्यास सज्ज आहे. टी-२० पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करून मुख्य स्पर्धेत प्रवेश घेतलेल्या बांगलदेशचा संघ चांगल्या लयीमध्ये आहे. सलामीवीर तमीम इक्बालने अखेरच्या पात्रता लढतीत ओमानविरुद्ध शतक तडकावले असल्याने त्याच्यावरच संघाची मुख्य मदार असेल. अष्टपैलू शाकिब अल हसनचा अनुभवही बांगलादेशसाठी निर्णायक ठरेल. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा शाकिब ईडन गार्डनची खेळपट्टी चांगली ओळखून असल्याने त्याचा फायदा तो बांगलादेशला नक्कीच करून देईल. दुसरीकडे पाकिस्तानने सर्व वाद बाजूला ठेवून क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले आहे. फिक्सिंगच्या आरोपानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या मोहम्मद आमीरमुळे पाकिस्तानची गोलंदाजी अधिक मजबूत आहे. मोहम्मद इरफान व वहाब रियाज यांचा मारा बांगलादेशसाठी डोकेदुखी ठरू शकतो. (वृत्तसंस्था)बांगलादेश : मशरदी मुर्तझा (कर्णधार), अराफत सनी, महमुदुल्लाह, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, शब्बीर रहमान, अबु हैदर, नुरुल हसन, अल अमीन हुसैन, नासिर हुसैन, शाकिब अल हसन, तमीम इक्बाल, तस्कीन अहमद, मोहम्मद मिथून आणि मुस्तफिझूर रहमान.पाकिस्तान : शाहीद आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद इरफान, शारजील खान, वहाब रियाज, मोहम्मद नवाज, मोहम्मद सामी, खालिद लतीफ, मोहम्मद आमीर, उमर अकमल, सरफराज अहमद, इमाद वसीम, अन्वर अली आणि खुर्रम मंजूर. हेड टू हेडपाकिस्तान-बांग्लादेश संघांदरम्यान आत्तापर्यंत ९ लढती झाल्या आहेत. ७ पाकिस्तानने व २ बांग्लादेशने जिंकल्या आहेत.सामन्याची वेळसायंकाळी ३.०० पासूनस्थळ : ईडन गार्डन, कोलकाता