- रितिका भारवाणी जयसिंघानीमैदानी खेळात दिवसागणिक नवीन स्पोर्टस्वेअरकडे नवीन खेळाडूंचा अधिक कल आहे! मैदानी खेळातील गणवेश किंवा स्पोर्टस्वेअर ही एक फॅशन झाली आहे. प्रत्येक दिवशीच्या उपक्रमाला नवीन गणवेश परिधान करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. शाळा, प्रवास किंवा कॉफी कोठेही या प्रकारच्या विविध स्पोर्टस्वेअर परिधान करण्याच्या मानसिकता आपण अनुभवत आहोत.सुंदर दिसण्यासाठी स्पोर्टस् फॅशनकडे खेळाडूंचा कल वाढला असून, आल्हाददायक कपडे परिधान करणे प्रत्येकास सोयीस्कर वाटू लागले आहे. घाम शोषून घेणारे, नवनवीन शैली, ब्रँडस्, कामात जास्त काळ तग धरणारे आणि फॅशनेबल स्टाईलच्या कपड्यांना पसंती मोठ्या प्रमाणात मिळत आहे. ऋतुमानानुसार स्पोर्टस्वेअरच्या आवडी-निवडी बदलत आहेत. काही प्रभावी आणि आकर्षक शैलीमुळे नवीन कपडे पसंत करणे हा जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे.कोणत्याही स्पोर्टस्वेअरवर वापरता येणारे बूट (स्निकर्स) लाही पसंती मिळत आहे. लोक हे बूट साधारणपणे सर्वच प्रकारच्या गणवेशांवर वापरण्यास प्राधान्य देत आहेत. मोठे ब्रँड असणाऱ्या कंपन्या ग्राहकास आकर्षित करीत आहेत, विविधबाबतीत निरीक्षण केले असता खेळाडूंत जणू काही नवनवीन पेहरावाचे कल वाढत आहेत, असे निदर्शनात येत आहे. शहरी ग्राहक जे सदैव अॅक्टिव्ह लाईफस्टाईलच्या मागे धावत असतात आणि चांगले दिसण्याचा प्रयत्नही करीत असतात. ते हा बदल पटकन स्वीकारतील आणि या ‘ट्रेंड’ला आत्मसात करतील.(‘ईला’च्या सहसंस्थापिका व क्रिएटिव्ह डायरेक्टर)
मैदानी खेळात स्पोर्टस्वेअर बनली एक फॅशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 2:20 AM