नवी दिल्ली : भारतात अनेक वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन केलेल्या रिव्हर्स स्विंगचा बादशहा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमच्या मते, वेगवान गोलंदाजी भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान बनत असून, नवोदित व युवा खेळाडू आज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांसारख्या गोलंदाजांना आपले आदर्श मानत आहेत.पाच वर्षांपूर्वी कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज प्रशिक्षक जबाबदारी पार पाडणाऱ्या अक्रमने अशोक डिंडा, ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांसारख्या गोलंदाजांना महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या होत्या. पाकिस्तानच्या या महान गोलंदाजाने वेगवान गोलंदाजी भारतीय क्रिकेटमध्ये मजबूत स्थान मिळवत असल्याचे सांगतानाच वेगवान गोलंदाजी म्हणजे केवळ एका स्पेलपुरती मर्यादित नसते, अशा इशारादेखील नवोदितांना दिला.याबाबतीत अक्रम यांनी सांगितले की, ‘भारतीयांमध्ये क्रिकेटप्रेम जबरदस्त आहे. एका आयपीएल सामन्यासाठी ७० हजार प्रेक्षकांची उपस्थिती अद्भुत आहे. खेळाच्या लोकप्रियतेमुळे आज वेगवान गोलंदाजीदेखील स्वत:चे वेगळे स्थान मिळवत असून, आज मोहम्मद शमी, यादव आणि वरुण अॅरोन यांचा चाहतावर्ग निर्माण होत आहे. (वृत्तसंस्था)
भारतात वेगवान गोलंदाजी स्थिरावतेय : अक्रम
By admin | Published: April 17, 2015 1:15 AM