शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

फेड एक्स्प्रेस सुस्साट...

By admin | Published: January 25, 2017 12:32 AM

१७ ग्रँडस्लॅम पटकावलेला स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने आपला दर्जा सिद्ध करताना आॅस्टे्रलियन ओपनच्या उपांत्य फेरीत

मेलबर्न : १७ ग्रँडस्लॅम पटकावलेला स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने आपला दर्जा सिद्ध करताना आॅस्टे्रलियन ओपनच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. अव्वल मानांकित अँडी मरे आणि द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच यांना नमवून स्पर्धेत ‘जायंट किलर’ ठरलेल्या जर्मनीच्या मिशा झ्वेरेवचा फेडररने सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. त्याचप्रमाणे महिला गटात अमेरिकेची दिग्गज खेळाडू व्हीनस विलियम्सनेदेखील उपांत्य फेरीत धडक मारली. झ्वेरेव आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवणार का, याकडेच टेनिसप्रेमींचे लक्ष होते. परंतु, अनुभवी फेडररने आपल्या ‘क्लास’ खेळाच्या जोरावर झ्वेरेवला टेनिसचे धडे देताना ६-१, ७-५, ६-२ असे लोळवले. पहिला सेट सहजपणे जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये फेडररला झ्वेरेवने चांगली झुंज दिली. या वेळी झ्वेरेवने काहीसा आक्रमक पवित्रा घेत सर्विस करताना नेट्सजवळून वेगवान फटके मारत फेडररला जेरीस आणले. मात्र, फेडररने शांतपणे खेळ करताना मोक्याच्या वेळी बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये झ्वेरेवने फेडररची सर्विसदेखील भेदली. परंतु, नंतर फेडररच्या अनुभवापुढे त्याचा निभाव लागला नाही. यानंतर तिसऱ्या सेटमध्ये फेडररने आपला अनुभव व दर्जा सिद्ध करताना झ्वेरेवच्या आव्हानातली हवाच काढली. उपांत्य सामन्यात फेडररपुढे आपल्याच देशाच्या स्टॅन वावरिंकाचे तगडे आव्हान असेल. वावरिंकाने अटीतटीच्या झालेल्या सामन्यात फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाचे आव्हान ७-६, ६-४, ६-३ असे परतावले. दरम्यान, सामन्यानंतर वावरिंकाच्या आव्हानाविषयी मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली, की ‘वावरिंकाने उपांत्य फेरी गाठल्याचा मला आनंद आहे. परंतु, त्याने याच्यापुढे जाण्याची आवश्यकता नाही. हीच कामगिरी पुरेशी आहे.’ दुसरीकडे, वावरिंका म्हणाला, की ‘उपांत्य फेरीत मला रॉजरशी भिडायचे आहे. काही समर्थकांसाठी हा सामना कठीण असेल. परंतु, मला आशा आहे, की काही जण माझा उत्साह नक्कीच वाढवतील.’ दुसरीकडे महिला गटात अमेरिकेच्या दिग्गज व्हीनस विलियम्सने रशियाच्या अनास्तासिया पावलिचेनकोवाला नमवून उपांत्य फेरी गाठली. (वृत्तसंस्था)विशेष म्हणजे यासह ती गेल्या २३ वर्षांत कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी सर्वांत वयस्क खेळाडू ठरली. ३६ वर्षीय व्हीनसने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना अनास्तासियाचे आव्हान ६-४, ७-६ असे संपुष्टात आणले. उपांत्य सामन्यात व्हीनसपुढे आपल्याच देशाच्या कोको वँडेवेघेचे कडवे आव्हान असेल. वँडेवेघेने फ्रेंच ओपन विजेत्या गर्बाइन मुगुरुजाला ६-४, ६-० असा धक्का देत आगेकूच केली. शिवाय स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत वँडेवेघेने अव्वल खेळाडू एंजेलिक कर्बरला नमवून खळबळ माजवली होती. त्यामुळे व्हीनसपुढे कडवे आव्हान असेल. ‘बाबा, प्लीज अजून एक सामना जिंका’, फेडरर पुरवतोय मुलांचा हट्टफेडररने आॅस्टे्रलियन ओपनमध्ये विजयी धडाका लावला असला तरी याचे मुख्य कारण आपली मुलं असल्याचे त्याने स्पष्ट केले. चार मुलांचा वडिल असलेल्या फेडररने मुलांच्या हट्टासाठी अधिक सामने जिंकण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. मुळात १८वे ग्रँडस्लॅम पटकावण्यापेक्षाही मुलांना अधिकवेळ आॅस्टे्रलियामध्ये मजामस्ती करता यावी यासाठीच आपला अधिक प्रयत्न असल्याचे फेडररने म्हटले. फेडररने म्हटले की. ‘पर्थमध्ये मुलांनी खूप एन्जॉय केले आणि मेलबर्नमध्ये त्याहून अधिक आनंद लुटत आहेत. मुलं खूप खेळत असून प्रत्येक दिवस बाहेर मजामस्ती करुन आनंदात घालवत आहेत. मुलांनी मला अनेकदा सांगितले आहे की, बाबा प्लीज तुम्ही हरु नका. आम्हाला अजून काही दिवस येथे मजा करायची आहे.’तसेच, ‘पहिल्यांदाच माझ्या मुलीने मला सांगितले की, आता मला स्वित्झर्लंडमध्येही स्कीइंग करायला आवडेल. ‘आणखी एक सामना जिंका, म्हणजे आम्हाला अजून येथे मजा करता येईल,’ हा मुलांचा हट्ट पुरवण्यास मला आवडते,’ असेही फेडररने म्हटले. सानिया, बोपन्ना एकमेकांविरुद्ध लढणारसानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय खेळाडूंनी मिश्र दुहेरीत आपआपल्या जोडीदारांसह विजयी कूच करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. विशेष म्हणजे दोन्ही भारतीय खेळाडू या फेरीत एकमेकांविरुद्ध लढतील. बोपन्नाने कॅनडाच्या गॅब्रिएला डेबरोवस्कीसह खेळताना युंग जान चॅन - लुकाज कुबोत या पाचव्या मानांकित जोडीचा ६-४, ५-७, १०-३ असा पराभव केला. दुसरीकडे, सानियाने झेक प्रजासत्ताकच्या इवान डोडिचसह खेळताना सेसेइ झेंग - अलेक्झांडर पेया यांचा २-६, ६-३, १०-६ असा पाडाव केला.