शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

फेडररने उडवला नदालचा धुव्वा

By admin | Published: March 17, 2017 12:30 AM

स्टार टेनिसपटू स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याने धमाकेदार खेळ करताना आपला कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनचा राफेल नदाल याचा सरळ २ सेटमध्ये धुव्वा उडवून

इंडियन वेल्स : स्टार टेनिसपटू स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याने धमाकेदार खेळ करताना आपला कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनचा राफेल नदाल याचा सरळ २ सेटमध्ये धुव्वा उडवून इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याच वेळी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सर्बियाचा बलाढ्य खेळाडू नोव्हाक जोकोविचला पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेत खळबळ माजली.जानेवारी महिन्यामध्ये आॅस्टे्रलियन ओपनचे विजेतेपद पटकावून कारकिर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम विजेतेपद फेडररने जिंकले होते. विशेष म्हणजे, त्या वेळीदेखील फेडररने नदालचाच पाडाव करून बाजी मारली होती. तो विजय योगायोग नसल्याचे सिद्ध करताना फेडररने बाजी मारली. शिवाय, हा सामना एकतर्फी ठरवताना फेडररने ६-२, ६-३ असा विजय मिळवून नदालला पुनरागमानाची एकही संधी दिली नाही. फेडररने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेताना सामन्यावर पकड मिळविली. दोन्ही सेटमध्ये एक वेळ नदालने पुनरागमनाची शक्यता निर्माण केली होती; परंतु फेडररने सलग दोन वेळा नदालची सर्व्हिस ब्रेक केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. फेडररच्या वेगवान सर्व्हिससह ताकदवान फोरहँड आणि नेटजवळील चपळ खेळापुढे नदालने गुडघे टेकले. या सामन्यात फेडररने नदालची सर्व्हिस एकूण चार वेळा ब्रेक केली. यामुळे दडपणाखाली आलेल्या नदालला आपला खेळ उंचावण्यात अखेरपर्यंत अपयश आले. उपांत्यपूर्व फेरीत फेडररपुढे कसलेल्या निक किर्गिओसचे कडवे आव्हान असेल. किर्गिओसने स्पर्धेतील धक्कादायक निकालाची नोंद करताना बलाढ्य आणि संभाव्य विजेता मानल्या गेलेल्या नोव्हाक जोकोविचला ६-४, ७-६ असे नमवले. विशेष म्हणजे, किर्गिओसने दोन आठवड्यांत दोन वेळा जोकोविचला धक्का दिला. पहिला सेट जिंकल्यानंतर किर्गिओसला दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचकडून अपेक्षित झुंज मिळाली. दुसरा सेट जिंकून जोकोविच सामना तिसऱ्या सेटमध्ये नेणार, असे दिसत असतानाच किर्गिओसने अंतिम क्षणी निर्णायक गुणांची कमाई करून सामन्यात बाजी मारली. त्याचबरोबर, चौथ्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून डोनाल्ड यंगचा ६-२, ६-४ असा पराभव केला. १७वा मानांकित जॅक सोक यानेही आगेकूच करताना मालेक जाजिरीचे कडवे आव्हान ४-६, ७-६, ७-५ असे परतवले. (वृतसंस्था)