ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 26 - सतरा वेळचा ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या फेडररने आज झालेल्या अत्यंत अटीतटीच्या उपांत्य लढतीत आपल्याच देशाच्या स्टॅनिस्लास वावरिंकावर 7-5, 6-3, 1-6, 4-6, 6-3 अशी मात केली.
फेडरर आणि वावरिंका यांच्यात झालेली उपांत्य लढत चुरशीची झाली. फेडररने दमदार सुरुवात करत पहिले दोन सेट 7-5, 6-3 असे जिंकले, पण वावरिंकाने पुढचे दोन सेट 6-1, 6-4 असे जिंकत सामन्यात पुनरागमन केले. पण निर्णायक पाचव्या सेटमध्ये फेडररने आपला खेळ उंचावताना सेट 6-3 ने जिंकत सामना खिशात टाकला.
आता फेडररकडे तब्बल साडे चार वर्षांनंतर ग्रँडस्लॅमचा दुष्काळ संपवण्याची संधी फेडररकडे आहे. तसेच अंतिम लढतीत फेडरर व स्पेनचा राफेल नदाल या कट्टर प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील हायव्होल्टेज अंतिम सामन्याची प्रतीक्षा टेनिसप्रेमींना असेल. मात्र त्यासाठी नदालला उपांत्य फेरीत दिमित्रोवचे आव्हान परतवावे लागेल.