एबी डिव्हिलियर्स लिहितो़...आयपीएल २०१६ ची पहिली क्वालिफायर लढत माझ्यासाठी भीतीदायक स्वप्न आणि सुखद शेवट अशी होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी ही मोठी संधी होती. दुपारी स्टेडियमकडे रवाना झालो त्यावेळी मी माझ्या पत्नीला सांगितले की निराश वाटत आहे. मला चांगले वाटत नव्हते.त्यानंतर आमच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत २० षटकांत गुजरात संघाला १५८ धावांत रोखले; पण त्यानंतर धवल कुलकर्णीने संस्मरणीय स्पेलमध्ये माझ्या संघातील अनेक सहकाऱ्यांना तंबूचा मार्ग दाखवला. दुसऱ्या टोकाला उभा राहून हे बघताना माझ्यावरील दडपण वाढत होते. आम्ही केवळ २९ धावांत पाच फलंदाज गमावले होते. भागीदारी होणे आवश्यक आहे, याचाच विचार करीत होतो. फार पुढचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक चेंडूवर धावा कशा वसूल करता येईल, याचा विचार करीत होता. स्टुअर्ट बिन्नीसोबत अशी एक भागीदारी साकार होताना दिसली; पण त्यानंतर तो बाद झाला आणि स्कोअर झाला ६ बाद ६८. त्यानंतर इक्बाल अब्दुल्लाच्या रूपाने चांगला जोडीदार लाभला. तो खेळपट्टीवर आला त्यावेळी शांत होता. त्याने मला स्ट्राईक देण्यावर भर दिला आणि संधी मिळाल्यावर चेंडूला सीमारेषा दाखविताना केवळ माझ्यावरील दडपणच कमी केले नाही तर मला विश्वासही प्रदान केला. आघाडीची फळी कोसळल्यानंतरही सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता असल्याचा मला विश्वास होता. टी-२० क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. त्यानंतर आम्ही एकेरी-दुहेरी धावा घेत लक्ष्याचा समीप जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. दरम्यान, खराब चेंडूला सीमारेषा दाखविण्यास प्राधान्य दिले. एकवेळ आम्हाला जोखीम पत्करणे गरजेचे झाले होते. त्यावेळी पावसाचे सावट निर्माण झाले होते. कर्णधार कोहलीने मैदानावर संदेश पाठविला की १५ व्या षटकानंतर आक्रमक खेळ करणे आवश्यक आहे. हा निर्णय योग्य ठरला. आम्ही त्या षटकात १४ धावा वसूल केल्या.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा जल्लोष मंगळवारी अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक होता. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत स्टेडियममध्ये एवढा आवाज ऐकलेला नाही. इक्बालने सलग तीन चौकार ठोकल्यानंतर स्टेडियम या जल्लोषाचा एक भाग झाले. हा एक चांगला सांघिक प्रयत्न होता. आरसीबी व्यवस्थापनाचे अधिकारी, प्रशिक्षक आणि संघातील सर्वंच खेळाडू अंतिम फेरी गाठण्यामुळे खूश होते. आता आम्हाला जेतेपद पटकावण्याची गरज आहे. (टीसीएम)
सामन्यापूर्वी निराश वाटत होते
By admin | Published: May 28, 2016 3:54 AM