शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

साक्षीच्या स्वागताचा जल्लोष

By admin | Published: August 25, 2016 4:23 AM

रिओ आॅलिम्पिकची कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिचे मायदेशात आगमन होताच जल्लोषात स्वागत झाले.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकची कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिचे मायदेशात आगमन होताच जल्लोषात स्वागत झाले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे साक्षीची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. तिचे आईवडील आणि नातेवाईक देखील उपस्थित होते. साक्षीने कांस्यपदक दाखवित चाहत्यांना अभिवादन केले.अनेक महिन्यानंतर आप्तेष्टांना पाहल्यिाने साक्षी काहीवेळ भावुक झाली होती. ती म्हणाली, ‘मी वडिलांना बिलगले आणि त्यांना पदक दाखविले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझे कुटुंब फार भावुक आहे. मला पाहून त्यांना अत्यानंद झाला. मला प्रेरणा देणारे कुुटुंबीय, कोच आणि सहकारी मल्लांची मी आभारी आहे. माझे कुटुंबीय आणि कोच यांनी स्वप्न साकार करण्यास फार मदत केली. सुशील आणि योगेश्वर दत्तसारख्या दिग्गजांनी मला प्रेरणा दिली. भारताची ध्वजवाहक होणे माझ्यासाठी गौरवपूर्ण क्षण होता.’ राष्ट्रपती भवनात यंदा खेलरत्न मिळणार हा आनंद साक्षीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. ती म्हणाली,‘या पुरस्कारासाठी निवड होणे दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.’(वृत्तसंस्था)>हरियाणात पोहचताच मिळाला अडीच कोटींचा चेक>साक्षी मलिक हिला गृहराज्य हरियाणात पाय ठेवताच बुधवारी अडीच कोटींचा चेक देण्यात आला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्यावतीने साक्षीचे जंगी स्वागत करण्यात आले.नवी दिल्लीत दाखल होताच विमानतळावर साक्षीच्या स्वागतासाठी हरियाणाचे अर्धे मंत्रिमंडळ उपस्थित होते. राज्याचे क्रीडामंत्री अनिल विज हे ५८ किलो फ्री स्टाईलमध्ये राज्याचे नाव उंचाविणाऱ्या साक्षीसोबत रिओहून सोबत आले. बहादूरगड येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी अडीच कोटीचा चेक तिच्या सुपूर्द केला. या शिवाय ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या कार्यक्रमासाठी साक्षीला राज्याची ब्रॅण्डदूत देखील बनविले. साक्षीच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत खट्टर म्हणाले,‘रेल्वेत साक्षीला पदोन्नती मिळावी यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जातील. आम्ही हरियाणा सरकारची क्लास वन नोकरी साक्षीसाठी राखीव ठेवली आहे. साक्षीने होकार कळविल्यास आम्ही तिच्या नोकरीचे आदेश काढू. साक्षीच्या मोखरा गावात राज्य सरकार क्रीडा नर्सरी आणि स्टेडियम उभारणार आहे.’२३ वर्षांच्या या कन्येचे बहादूरगड येथे पारंपरिक पगडी घालून स्वागत झाले. यानंतर साक्षीने स्वत:च्या मोखरा गावात पोहोचली. आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या हरियाणातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जाणार आहेत.>इतक्या आत्मीयतेने स्वागत केल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. हजारो लोकांनी माझा उत्साह वाढविल्याचे पाहून आनंद झाला. या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्यामुळे मी पदक जिंकू शकले. आॅलिम्पिक पदक जिंकणे माझे स्वप्न होते. त्यासाठी कठोर मेहनत घेतली. पदक मिळवल्यानंतर स्वप्नवत वाटत आहे. - साक्षी