शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

मैदानावर सकारात्मक आक्रमकता हवी

By admin | Published: March 30, 2017 1:29 AM

‘आ क्रमकता’ हा शब्द विविध प्रकारे वापरला जातो हे मी ऐकले होते. यंदा भारतातील क्रिकेट मोसमात या शब्दाचा बराच उहापोह

हर्षा भोगले लिहितो..‘आ क्रमकता’ हा शब्द विविध प्रकारे वापरला जातो हे मी ऐकले होते. यंदा भारतातील क्रिकेट मोसमात या शब्दाचा बराच उहापोह झाला. भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेदरम्यान शाब्दिक चकमक गाजलीच शिवाय शारीरिक इशाऱ्यांनी खळबळ माजवताच वातावरण तापले होते. धरमशाला येथे वाक्युद्धाने तर कळस गाठला. पण यातून एक बोध घ्यायलाच हवा. आक्रमकता ही सकारात्मकतेने स्वीकारायला हवी. कायम कटुता येईल, असे कुठलेही वर्तन खेळाडूंकडून होऊ नये.भारतीय संघ सामन्यादरम्यान बराच आक्रमक जाणवला. निर्णायक लढतीत पाच गोलंदाजांसह खेळणे व विजय मिळविणे ही एक प्रकारची आक्रमताच होती. विराटच्या अनुपस्थितीत रहाणे आणि विजय यांचे फलंदाजीत सातत्य नसताना तसेच नायर फारसा प्रभावी दिसत नसताना रहाणेने अंतिम एकादशची केलेली निवड ही देखील आक्रमकता म्हणावी लागेल. तळाच्या स्थानावरील फलंदाजांनी धावा काढून पाच गोलंदाज खेळविण्याचे समर्थन करणे तसेच सामना जिंकणे हे धाडसाचे काम होते. सहा फलंदाज खेळविणे विश्व क्रिकेटमध्ये बचावात्मक मानले जाते. अशास्थितीत विजयावर शिक्कामोर्तब करणे हे काम आक्रमकतेशिवाय शक्य नाही. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यातून आक्रमकता स्पष्ट झाली. सामन्याअखेर अजिंक्य रहाणने फलंदाजीत दाखविलेली आक्रमकता, स्वयंनिर्धार आणि आत्मविश्वास यातून विजयाचा मार्ग प्रशस्त झाला.तिसऱ्या दिवशी भारतीयांनी केलेली गोलंदाजी या मालिकेत अधोरेखित करणारी घटना ठरली. उमेश यादवचे चेंडू फलंदाजांच्याू तोंडचे पाणी पळविणारे होते. अश्विन आणि जडेजा यांच्या फिरकीतील भेदकता प्रकर्षाने दिसली. जडेजा हा गडी बाद करणारा गोलंदाज म्हणून पुढे येत असल्याचा बदल उल्लेखनीय ठरला. १०६ धावांचे विजयी लक्ष्य गाठण्यासारखेच होते. लोकेश राहुलची आक्रमक फटकेबाजी पाहिल्यानंतर मला खात्री पटली की उत्कृष्ट फलंदाज असलेला राहुल आणखी बलाढ्य बनत चालला आहे. राहुलने स्वत:ला जखमांपासून दूर ठेवल्यास भविष्यात तो देखील महान द्रविड आणि कुंबळे यांच्यासारखाच आक्रमक खेळाडू बनू शकतो यात शंका नाही.