नवी दिल्ली : आता जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार २० नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
फीफा विश्वचषक २०२२ मध्ये एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत, मात्र यामध्ये नेहमीप्रमाणे भारताला स्थान मिळाले नाही. कारण भारतीय संघ पुन्हा एकदा फीफा विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यामध्ये अपयशी झाला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पात्रता फेरीतच दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र कतार, सौदी अरेबिया, इराण, जपान, आणि दक्षिण कोरिया या आशियातील संघांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारताने देखील एकदा या फुटबॉल विश्वचषकात जागा मिळवली होती मात्र एका कारणामुळे संघाचे ते स्वप्न स्वप्नच राहिले.
शूज घालूनच खेळण्याची दिली होती परवानगी१९५० साली ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी भारत पात्र ठरला होता, तरीही संघाला सहभाग घेता आला नव्हता. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तेव्हा भारतीय खेळाडूंना अनवाणी पायाने फुटबॉल खेळण्याची सवय होती, जी त्यांच्यासाठी घातक ठरली. मोहम्मद अब्दुल सलीम नावाचा भारतीय फुटबॉलपटू त्याच्या काळात स्कॉटिश फुटबॉल क्लब 'सेल्टिक'साठी अनवाणी पायाने हा खेळ खेळायचा. फीफाच्या नियमांनुसार, खेळाडूंना विश्वचषकात शूज घालूनच खेळायचे होते, परंतु भारतीय खेळाडूंना शूज घालून खेळण्याची सवय नव्हती. त्यामुळे त्यावेळेसही भारताला विश्वचषकापासून दूर राहावे लागले होते.
तेव्हापासून स्वप्न स्वप्नच राहिलेदुसरे कारण असेही सांगण्यात आले की हा सामना परदेशी मैदानावर होणार असल्याने भारतीय फुटबॉल संघटनेने तसेच सरकारने खर्च उचलण्यास नकार दिला होता. विशेष बाब म्हणजे फीफा भारतीय संघाचा खर्च उचलण्यास तयार असतानाही भारताला या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. संघातील निवडीवरून वाद, सरावाचा अभाव ही देखील सहभागी न होण्याची कारणे ठरली आहेत.
रॅंकिंगच्या बाबतीत भारत खराब स्थितीतदरम्यान, भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी खेदाची बाब म्हणजे १९५०च्या विश्वचषकापासून भारतीय संघ पुन्हा एकदाही या मेगा टूर्नामेंटसाठी पात्र ठरू शकला नाही. फीफाच्या क्रमवारीतही भारतीय फुटबॉल संघाची स्थिती खराब असून सध्या संघ क्रमवारीत १०६व्या स्थानावर आहे. अर्थात टॉप-१०० मध्येही भारताचा समावेश नाही.
यावेळी विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊसअलीकडेच फीफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम देखील जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वाटण्यात येणारी बक्षीस रक्कम सुमारे ३,५८५ कोटी एवढी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला ४२ मिलियन म्हणजेच सुमारे ३४२ कोटी रूपये मिळणार आहेत. मागील अर्थात २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम ४ मिलियन डॉलरहून अधिक आहे. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"