FIFA World Cup Final: काल कतारमध्ये पार पडलेल्या FIFA World Cup Final मध्ये अर्जेंटिनानेफ्रान्सवर रोमहर्षक विजय मिळवला. (France Vs Argentina) अंतिम सामन्यात अर्जेंटिनानेफ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. अतिरिक्त वेळेनंतर दोन्ही संघ 3-3 असे बरोबरीत होते. यानंतर पेनल्टी शूटआऊटमधून अर्जेंटिना विश्वविजेता ठरला. दरम्यान, अर्जेंटिनाच्या हातून मिळालेल्या पराभवानंतर फ्रान्समध्ये दंगल (France Riots) उसळली.
द सनमधील वृत्तानुसारस, सामन्यानंतर फ्रान्समध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रस्त्यावरील अनेक वाहने पेटवून दिली. यादरम्यान, अनेक लोकांची पोलिसांशीही झटापट झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. पॅरिस, लियॉन आणि नाइस सारख्या शहरांमध्ये फुटबॉल चाहत्यांनी उच्छाद मांडला.
फायनल पाहण्यासाठी हजारो फुटबॉल चाहत्यांनी फ्रान्समधील विविध शहरांतील रेस्टॉरंट आणि बारमध्ये गर्दी केली होती. मात्र, पॅरिससह अनेक शहरांनी हा सामना मोठ्या पडद्यावर प्रसारित करण्यास नकार दिला. फुटबॉल विश्वाचा नवा सम्राट फ्रान्स असेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली आणि सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला, जिथे फ्रान्सचा लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाकडून 4-2 असा पराभव झाला. यानंतर चाहत्यांचा संयम सुटला आणि अनेक शहरांमध्ये दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
सोशल मीडियावर पॅरिस आणि लिऑनच्या रस्त्यावर झालेल्या गोंधळाचे व्हिडिओ शेअर होत आहेत. यामध्ये पोलिसांच्या अश्रूधुराच्या नळकांड्यापासून लोक पळताना दिसत आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याच्या तोफांचाही वापर केला. लिओन शहरात पोलिसांनी डझनभर आंदोलकांना अटक केली आहे.