याया टौरी याच्याशी केलेली बातचीत....याया टौरीहा ‘मिडफिल्डर’ मॅन्चेस्टर सिटीकडून गेल्या २०१० पासून खेळत आहे. संघासाठी त्याचे योगदान अमूल्य असे आहे; परंतु गुरुवारी इथियाड येथे मॅन्चेस्टर युनायटेडविरुद्ध होणारी त्यांची लढत ही एका अंतिम सामन्याप्रमाणेच असेल. या मोठ्या ‘डर्बी’त कोण बाजी मारणार याची प्रचंड उत्सुकता लागली आहे; कारण प्रीमिअर लीग स्पर्धेत टॉप-४ मध्ये स्थान मिळविण्यासाठी दोन्ही संघ संघर्ष करीत आहेत. आता केवळ सहा सामने शिल्लक आहेत. मॅन्चेस्टर सिटी हा संघ चौथ्या तर मॅन्चेस्टर युनायटेड त्यांच्या एका स्थानाने मागे आहे. आयव्हरी कोस्टचा ‘स्टार’ याया टौरी संघाला मोठा विजय मिळवून देण्याचा प्रयत्नात आहे. त्यालाही हा सामना म्हणजे ‘फायनल’ असल्याचे भासत आहे. सामन्यापूर्वी त्याच्याशी साधलेला हा संवाद...टॉप चार संघांत स्थान मिळविण्यासाठी गुरुवारी पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढत होत आहे. या लढतीविषयी मॅन्चेस्टर सिटीच्या गोटात काहीसे भीतीचे वातावरणही असेल. याबाबत तुला काय वाटते?पुढे काय होईल हे सागू शकत नाही. मॅन्चेस्टर युनायटेडविरुद्धचा सामना नेहमीच विशेष असाच राहिला आहे; पण या वेळी तो अधिक महत्त्वाचा वाटतो. माझ्यासाठी हा सामना एक ‘फायनल’ असेल.सिटीच्या खेळाडंूसाठी कोणता संदेश देशील?गेल्या सहा वर्षांपासून सिटी चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरत आहे. त्यामुळे गुरुवारचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळाडूंना हेच सांगेन की, चॅम्पियन्स लीगचा पुरस्कारमिळवायचा असेल तर पुनरागमन करीत जबरदस्त खेळ करावा लागेल.पॉल पोग्मा हा तुझा जवळचा मित्र. तू दुखापतग्रस्त झाला. त्याबाबत..तो उत्तम खेळाडू आहे. त्याच्याबाबत मी थोडा नाराज आहे; कारण तो मॅन्चेस्टर सिटीकडून खेळावा, अशी माझी इच्छा होती. त्याच्याशी मी बोललोही होतो. आता त्याच्याविरुद्ध खेळावे लागत आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. तो खेळाचा चांगला आनंद लुटतो.२०१० पासून तू सिटीकडून खेळत आहे. त्यामुळे तुला या सामन्याचे महत्त्व काय हे चांगले माहीत आहे. त्याबद्दल काय सांगशाील?निश्चितच, प्रत्येकासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे, याची मला जाण आहे. हा मोठा सामना आहे. यात खेळण्याची मलाही खूप उत्सुकता आहे. आम्ही खूप आनंद घेणार आणि जिंकणारसुद्धा. गेल्या आॅक्टोबरपासून युनायटेडने पराभव पाहिलेला नाही. त्यामुळे तुमच्यासाठी ही चांगली टक्कर असेल, असे वाटत नाही?माहीत आहे. त्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. आमच्यासाठी संघर्ष असेल. २२ दिग्गज खेळाडू मैदानावर असतील. जुझे मॉरिन्होसारखा दिग्गज व्यवस्थापकही मैदानावर असेल. ही एक मोठी लढाई असेल. एफए चषकानंतर पुनरागमन करण्याचा आम्हाला प्रयत्न करावा लागेल. आम्हाला विजय हवाय. टॉप-३ गाठण्याचे आमचे ध्येय आहे. त्यानुसार झुंजावे लागणार याची कल्पना आहे. एफए चषकात आर्सेनलकडून पराभूत झाल्यानंतर खेळाडूंची मनस्थिती कशी होती? मानसिकरीत्या ते यातून सावरले आहेत?हो...आर्सेनलविरुद्धच्या पराभवाला रेफ्रीचे चुकीचे निर्णयसुद्धा कारणीभूत आहेत; पण फुटबॉलमध्ये या गोष्टी होतात. कधी कधी सगळे काही तुमच्याविरुद्ध घडत असते. ते स्वीकारून पुढे जाणे हेच तुमच्यासाठी फायद्याचे असते. आम्ही जर युनायटेडविरुद्ध जिंकलो तर आम्ही आर्सेनलविरुद्धच्या पराभवाच्या कटू आठवणी विसरणार. पराभूत झालो तर आमच्यासाठी अधिक कठीण होईल. (पीएमजी)
मॅन्चेस्टर युनायटेडविरुद्धची लढत आमच्यासाठी फायनलच!
By admin | Published: April 27, 2017 12:44 AM