१७ वर्षांखालील फुटबॉल : फिफा शिष्टमंडळाकडून ‘फातोर्डा’ची पाहणी!मडगाव : फातोर्डा येथील स्टेडियमवर झालेल्या इंडियन सुपर लीग स्पर्धेतील सामन्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला. असाच प्रतिसाद १६ वर्षांखालील एएफसी स्पर्धेला मिळाला, तर १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना येथे खेळविण्यात येईल, असे संकेत फिफा संघटनेचे अधिकारी, तसेच आयोजक जेम यारजा यांनी दिले. एवढेच नव्हे, तर स्टेडियमचा दर्जा उत्कृष्ट असून, पुढील तयारीला जोमाने लागा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळे विश्वचषकातील सामने गोवेकरांना पाहण्याची संधी मिळेल, यावर शिक्कामोर्तब झाला. स्टेडियमचा दर्जा उत्कृष्ट असून, विश्वचषकातील सामने येथे खेळविण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगत जेम यारजा यांनी पुढील कामांना जोमाने लागा, असे सांगितले. येत्या सप्टेंबरमध्ये १६ वर्षांखालील एएफसी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या प्रतिसादावर बरेच काही अवलंबून असल्याचेही ते म्हणाले. एएफसी चषक फुटबॉल स्पर्धा आणि १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा या दोन्ही अतिमहत्त्वाच्या असून, शासनाकडून या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही. या स्पर्धेला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.
...तर विश्वचषकाचा अंतिम सामना गोव्यात
By admin | Published: February 17, 2016 2:37 AM