शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

...अखेर जोडी जमली

By admin | Published: June 12, 2016 6:19 AM

अनुभवी टेनिसपटू लियांडर पेस याचा सातव्यांदा आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एआयटीएफच्या शिष्टाईनंतर रोहण बोपन्ना याने पेसला दुहेरीचा

नवी दिल्ली : अनुभवी टेनिसपटू लियांडर पेस याचा सातव्यांदा आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एआयटीएफच्या शिष्टाईनंतर रोहण बोपन्ना याने पेसला दुहेरीचा जोडीदार म्हणून स्वीकारले. यासोबतच रिओ आॅलिम्पिकबाबत भारतीय संघाबद्दलच्या सर्व शंकांना देखील विराम मिळाला आहे. बोपन्ना हा आधी साकेत मिनेनीसोबत जोडी बनविण्यास उत्सुक होता; पण टेनिस महासंघ पेस- बोपन्ना हेच पदक जिंकू शकतात, यावर ठाम राहिल्याने बोपन्नाला एक पाऊल मागे यावे लागले. बोपन्नाला मिश्र दुहेरीत सानिया मिर्झासोबत खेळायचे असल्याने त्याच्याकडे पदक जिंकण्याच्या दोन संधी असतील. सानिया दुहेरीत प्रार्थना ठोंबरे हिच्यासोबत खेळणार आहे. प्रार्थना सानियाच्या अकादमीत सराव करते. बोपन्ना - पेस यांना एआयटीएफने डेव्हिस चषक संघातही स्थान दिले आहे. एआयटीएने यंदा सात सदस्यीय संघ जाहीर केला असून, बोपन्ना-पेस यांनी रिओ आॅलिम्पिकआधी काही वेळ सोबत घालविल्यास ताळमेळ बसू शकेल, असे महासंघाला वाटते. एआयटीए अध्यक्ष आणि आयटीएफ उपाध्यक्ष अनिल खन्ना यांनी संघ जाहीर केल्यानंतर सांगितले की, खेळाडूंनी आमच्या शिष्टाईचा स्वीकार केला आहे. आता देशाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी सहजपणे खेळावे. डेव्हिस चषक सांघिक स्पर्धा असल्याने आॅलिम्पिकपूर्वी ताळमेळ बसेल, असा विश्वास वाटतो. डेव्हिस चषक कोच झिशन अली याला आॅलिम्पिकसाठी कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे.स्वप्न साकार : पेसरिओ आॅलिम्पिकसाठी बोपन्नाचा जोडीदार म्हणून निवड झालेला भारताचा सर्वांत अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेसने स्वप्न साकार झाल्यासारखे वाटत असल्याचे म्हटले आहे. प्रतिक्रिया देताना पेसने म्हटले की, विक्रमी सातव्यांदा आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न साकार झाल्यासारखेच आहे. मी त्यासाठी अखिल भारतीय टेनिस महासंघाचा (एआयटीए) आभारी आहे. महासंघामुळे मला पुन्हा एकदा जर्सीवर तिरंगा लावण्याची संधी मिळणार आहे.’ १७ जून रोजी ४३ वर्षांचा होणारा पेस म्हणाला, ‘राष्ट्रध्वजासाठी खेळणे माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरले आहे. मी चाहत्यांचा आभारी आहे. त्यांचे प्रेम व पाठिंबा कारकिर्दीत माझ्यासाठी टॉनिक ठरले आहे.’‘‘याआधी आमच्या जोडीने विशेष कमाल केलेली नाही; पण मी टेनिस संघटनेच्या निर्णयाचे स्वागत करतो. आमचा खेळ एकमेकांना अनुकूल आणि पूरक नव्हता. यंदा काही वेगळे घडेल, अशी अपेक्षा बाळगतो.’’- रोहण बोपन्ना.