हॅम्बर्ग : वाइल्ड कार्डद्वारे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रवेश मिळवलेल्या भारताचा गौरव बिधूडी याला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.अमेरिकेच्या ड्यूक रेगनविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने अंतिम फेरीतील त्याचे स्थान हुकले. यासह या स्पर्धेत भारताच्या नावावर केवळ एका कांस्यपदकाची नोंद झाली. निर्णायक उपांत्य फेरीत २० वर्षीय अमेरिकन बॉक्सरने सुरुवातीला बचावात्मक भूमिका घेतल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी, गौरवनेही जोरदार प्रत्युत्तर देताना लढत एकतर्फी होणार नसल्याचा इशारा दिला. .दुसºया फेरीत गौरवने चांगले पुनरागमन केले. परंतु, तिसºया फेरीत सावध भूमिका घेऊन गौरवचा अंदाज घेतल्यानंतर रेगनने जोरदार ठोसे मारत विजयावर शिक्का मारला. यानंतर सुवर्णपदकासाठी रेगन इंग्लंडच्या पीटर मॅकग्रीलच्या आव्हानास सामोरा जाईल.
...अखेर गौरवला कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 3:56 AM