रिओ : रिओ पॅरालिम्पिकच्या वेटलिफ्टिंग प्रकारात भारतीय वेटलिफ्टर फर्मान बाशा कांस्य पदकापासून वंचित राहिला. गुरुवारी झालेल्या ४९ किलो वजन गटात त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानवे लागले.२०१० च्या पॅरा आशियाई स्पर्धेचा कांस्य विजेता बाशा याने पहिल्या प्रयत्नात १४९ किलो वजन उचलताच त्याच्याकडून पदकाची अपेक्षा करण्यात येत होती. पण दुसऱ्या प्रयत्नांत १५० तसेच तिसऱ्या प्रयत्नांत १५५ किलो वजन उचलण्यात त्याला अपयश येताच चौथ्या स्थानावर घसरावे लागले. भारताने रिओमध्ये १९ खेळाडूंचे पथक पाठविले आहे. या प्रकारात व्हिएतनामचा कांग वॉन याने विश्वविक्रमासह १८१ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले. जॉर्डनचा ओमार कराडा याला १७७ किलो वजनासह रौप्य आणि हंगेरीच्या नेडोर टंकेलने कांस्य पटकविले. पात्रता फेरीत नेमबाज बाहेरपॅरालिम्पिकच्या पहिल्या दिवशी नेमबाज नरेशकुमार शर्मा हा पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत पराभूत झाला. नरेशची कामगिरी निराशाजनक राहिली. तो अखेरच्या स्थानावर घसरला. नरेशने ९८.१, ९५.६, ९९.२ आणि १०३.३ असे चार प्रयत्नांत एकूण ५८३ गुण नोंदविले. द. कोरियाचा जिन हो पार्क याने ६२५.३ गुणांसह अव्वल स्थान पटकवित अंतिम फेरी गाठली. पॅरालिम्पिकचा हा विश्वविक्रम होता. सर्बियाचा लासनो अराजी दुसऱ्या तसेच संयुक्त अरब अमिरातचा अब्दुल्ला सुल्तान अलअयारनी तिसऱ्या स्थानावर आला. या प्रकारात २२ खेळाडू होते.आठ जण अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. >पॅरालिम्पिकच्या मुख्य अंशांचे प्रसारण!रिओ पॅरालिम्पिकचे भारतात थेट प्रक्षेपण होत नसले तरी भारतीय चाहत्यांना मुख्य अंश पाहण्याची संधी असेल. सोनी सिक्स आणि सोनी ईएसपीएनवर दर दिवशी एक - एक तासांचे दोन भाग सादर करणार आहे. दररोज एक तासांचे हायलाईट्स असतील. दोन्ही हायलाईट्स वेगवेगळे असतील, असे सोनी वाहिनीच्यावतीने सांगण्यात आले आहे. दूरदर्शनने मात्र भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे प्रक्षेपण करण्याची कुठलीही जबाबदारी स्वीकारली नाही.>थाळीफेक : सरोहा सातव्या स्थानीभारताचा पुरुष थाळीफेकपटू अमितकुमार सरोहा एफ ५२ गटात फायनलमधील निराशाजनक कामगिरीनंतर सातव्या स्थानावर घसरला. आशियाई पॅरास्पर्धेचा पदक विजेता अमित पहिल्या तिन्ही प्रयत्नांत अपयशी ठरल्यानंतर चौथ्या प्रयत्नांत त्याने ९.०१ मीटर थाळीफेक केली पण सातव्या स्थानावर राहिला. लाटव्हियाचा ऐगर्सने २०.८३ मीटरसह सुवर्ण जिंकले. पोलंडचा रॉबर्ट १९.१० मीटरसह रौप्याचा मानकरी ठरला. क्रोएशियाचा व्हेलिमिर याला १८.२४ मीटरसह कांस्य मिळाले.
फर्मान बाशाचे कांस्य हुकले
By admin | Published: September 10, 2016 3:41 AM