नवी दिल्ली : लिटिल मास्टर सुनील गावसकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे अनेक विक्रम आणि भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने कसोटी सामन्याच्या एकाच डावात घेतलेल्या विक्रमी १० बळींचा साक्षीदार ठरलेले दिल्लीचे फिरोजशहा कोटला स्टेडियम कायमच वादाचे केंद्र ठरले आहे. सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यातील वादामुळे येथे राजकीय आखाड्याचे स्वरूप आले आहे.नुकताच येथे खेळविण्यात आलेला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामना अनेक समस्या पार केल्यानंतर यशस्वीपणे पार पडला. मात्र आता दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) आपले माजी अध्यक्ष आणि सध्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर डीडीसीएच्या कार्यकाळामध्ये आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप केल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला.डीडीसीए स्टेडियमवर भारत - दक्षिण आफ्रिका कसोटी सामना संपल्यानंतर काही दिवसांनीच येथे केंद्र सरकार व दिल्ली सरकार यांच्यातील वादामुळे राजकीय आखाड्याचे स्वरुप आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावल्यानंतर केंद्र सरकारवर सत्तारूढ असलेल्या भाजपाने जेटली यांचा भक्कम बचाव केला. त्यात भर म्हणजे, कित्येक वर्षांपासून डीडीसीएच्या कारभाराविरोधात आवाज उठवलेल्या कीर्ती आझाद आणि बिशनसिंग बेदी या भारताच्या माजी क्रिकेटपटूंनीही उडी घेतली आहे. याशिवाय दिल्लीचा रणजी कर्णधार यानेही नुकताच डीडीसीएच्याविरोधात प्रतिक्रिया दिली होती, की ही संस्था क्रिकेट आणि खेळाडूंच्या हितासाठी कोणतेही कार्य करीत नाही. (वृत्तसंस्था)दिल्लीच्या आप सरकारने आतापर्यंत डीडीसीए भ्रष्टाचाराविषयी केवळ १५ टक्के माहितीचा खुलासा केला आहे. परंतु येत्या रविवारी मी उर्वरित सर्व माहितींचा खुलासा करणार आहे. माझी लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध असून ती मी सुरूच ठेवणार आहे. - कीर्ती आझाद, माजी क्रिकेटपटू
फिरोजशहा कोटला ‘वादा’चा आखाडा
By admin | Published: December 19, 2015 12:19 AM