शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

कोलकाता नाइट रायडर्सचं प्रथम क्षेत्ररक्षण

By admin | Published: April 10, 2016 7:55 PM

कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दिल्ली डेयरडेविल्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात येईल

 ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. १० -  आयपीएलच्या ९व्या सत्राची काल मुंबई आणि पुण्याच्या सामन्याने सुरवात झाली, आज ९ व्या सत्रातील दुसरा सामना कोलकाताच्या इडण गार्डन मैदानावर खेलवला जात आहे. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दिल्ली डेयरडेविल्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात येईल. यावर्षी दिल्ली डेयरडेविल्सने कर्णधारपदाची धुरा अनुभवी जलदगती गोंलदाज झहीर खान कडे सोपवली आहे. कोलकाताने संघात सुनील नारायणेचा समावेश केला नाही.
टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चार षट्कार ठोकून ‘किंग’ बनलेला वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट याच्या कामगिरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीदरम्यान विशेष लक्ष राहील.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड उत्तमच आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अपेक्षानुरुप कामगिरी न करू शकलेल्या या संघाला संयोजन सुधारावे लागेल. केकेआरला पाच वर्षांत तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी पहिल्या सामन्यापासून विजयी लय कायम राखायची आहे.
दिल्लीने यंदा संघात आमूलाग्र बदल केले. युवा खेळाडूंवर यंदा अधिक विश्वास दाखविण्यात येत आहे. ब्रेथवेटवर या संघाने चार कोटी २० लाख खर्च केले तेव्हा फारसे कुणी ओळखत नसावेत पण टी-२० विश्वचषकाने त्याला स्टार बनविले. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखालील दिल्ली संघात रिषभ पंत, महिपाल लोमरोर, खलिद अहमद हे १९ वर्षे गटातील खेळाडू आहेत. संजू सॅमसन, करुण नायर, पवन नेगी, श्रेयस अय्यर हे त्यांना मार्गदर्शन करतील.
प्रतिस्पर्धी संघ - 
दिल्ली डेयरडेविल्स : झहीर खान (कर्णधार), क्वींटन डिकॉक, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, करुण नायर, संजू सॅमसन, पवन नेगी, कार्लोस ब्रेथवेट,ख्रिस मॉरिस, अमित मिश्रा, नाथन कोल्टर नाइल
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, कोलिन मुन्रो, आंद्रे रसेल, युसूफ पठाण, पीयूष चावला, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जॉन हेस्टिंग्स, ब्रॉड हॉग