शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मराठमोळ्या खेळाडूने जिंकलेले पहिले पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 5:45 AM

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने भारताच्या या पदकवीरांचा घेतलेला हा आढावा...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टोकियो ऑलिम्पिकनंतर आता क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे ते पॅरालिम्पिक स्पर्धेकडे. टोकियो येथेच २४ ऑगस्टपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत कोणते संघ पदकांची लयलूट करणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. १९६८ सालापासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १२ पदके जिंकली असून यामध्ये चार सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने भारताच्या या पदकवीरांचा घेतलेला हा आढावा...

हीडलबर्ग १९७२भारतीय सेनेत कार्यरत असलेल्या पेटकर यांनी जलतरणात भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा पराक्रम केला. त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ३७.३३ सेकंदाची वेळ देत विश्वविक्रमासह सुवर्ण पटकावले. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक ठरले. १९६५च्या भारत-पाक युद्धादरम्यान पेटकर यांनी आपला हात गमावला होता. यानंतर ते जलतरणाकडे वळाले होते. 

न्यूयॉर्क, स्टॉक मँडविल १९८४ जोगिंदर सिंग बेदी यांनी गोळाफेकमध्ये रौप्य, तर थाळीफेक आणि भालाफेकमध्ये प्रत्येकी कांस्यपदक जिंकले. पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिकणारे भारतीय म्हणून जोगिंदर यांनी विक्रम केला आहे.  भीमराव केसरकर यांनी भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. याच स्पर्धेत जोगिंदर यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 

अथेंन्स २००४ देवेंद्र झांझरियाने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकत ६२.१५ मीटरची विश्वविक्रमी फेक केली. यासह पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची २० वर्षांपासूनची पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आली. राजिंदर सिंग राहेलू याने या स्पर्धेत भारताला दुसरे पदक मिळवून दिले. पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत १५७.५ किलो वजन उचलत कांस्य जिंकले.

रिओ २०१६ भालाफेकीत पुन्हा एकदा विश्वविक्रमासह देवेंद्रने सुवर्ण जिंकताना पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. आता टोकियोमध्ये देवेंद्र सुवर्ण हॅटट्रिकसाठी प्रयत्न करेल. उंच उडीमध्येच वरुण सिंग भाटी याने १.८६ मीटरच्या उडीसह कांस्यपदक जिंकले. वरुणची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली.दीपा मलिक पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने गोळा फेकीमध्ये ४.६१ मीटरची फेक करत रौप्य दक जिंकले.

लंडन २०१२गिरीश नागरजेगौडा हा लंडन पॅरालिम्पिक स्पर्धेत एकमेव पदक विजेता भारतीय ठरला. त्याने उंच उडीत १.७४ मीटरची उडी घेत रौप्य पदक पटकावले. या खेळात पदक जिंकणारा गिरीश पहिला भारतीय ठरला. 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा