नवी दिल्ली : राष्ट्रीय विजेता जितेंद्र (७४ किलो) आणि मंजू (५८ किलो) यांच्यासह १२ भारतीय युवा राष्ट्रीय पैलवान यावर्षी व्यावसायिक कुस्ती लीग (पीडब्लूएल) मध्ये सहभागी होणार आहेत. हे युवा खेळाडू या स्पर्धेत दिग्गजांचा सामना करतील.जितेंद्र, कृष्ण आणि मंजू यांनी या वर्षी नंदिनीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले, तर संगीता फोगट हिने यावर्षी ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये ५५ किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली. आता त्यांच्यासाठी पीडब्ल्यूएल एक आव्हान ठरेल. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, ‘‘युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण आहे. आम्ही संघ स्तरावर कॅडेट आणि ज्युनियर गटातील पैलवानांकडे विशेष लक्ष देतो. त्यामुळेच आता या गटातील पैलवान आता वरिष्ठ गटात चांगला खेळ करत आहेत.’’जयपूरचे विनोद ओमप्रकाश आणि पूजा ढांडा, मुंबईचा प्रीतम आणि दिल्लीची संगीता फोगट हे त्यातील खेळाडू आहेत. विनोदने यावर्षी बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई वरिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले.पूजा ढांडा युवा आॅलिम्पिकची माजी रौप्यपदक विजेती आहे, तर प्रीतमने यावर्षी मनिलात आशियाई ज्युनियर कुस्तीत रौप्यपदक पटकावले. संगीता हिने आशियाई कॅडेट कुस्तीत रौप्यपदक मिळवले. पंजाब संघाच्या पंकज राणा याने राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. या बाबत लीगचे प्रमोटर कार्तिकेय शर्मा म्हणाले की,‘‘ राष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूंना आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेत्यांसोबत सामना करण्याची संधी मिळेल. त्यातून त्याां खेळ उंचावेल. त्याचा फायदा त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल.’’
पीडब्ल्यूएलमध्ये पहिल्यादांच १२ भारतीय युवा मल्लांना संधी
By admin | Published: December 23, 2016 1:20 AM