शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच डिव्हिलिअर्सवर आली ही नामुष्की

By admin | Published: June 08, 2017 10:07 PM

या सामन्यातील पराभवापेक्षा आफ्रिकेचा विस्फोटक खेळाडू आणि कर्णधार ए बी डिव्हिलिअर्ससाठी हा सामना ऐतिहासीक ठरला पण वेगळ्या कारणामुळे.

ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 8 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभव पत्करावा लागला. डकवर्थ लुइस नियमानुसार पाकिस्तान संघाला 19 धावांनी विजयी घोषीत करण्यात आलं.  या सामन्यातील पराभवापेक्षा आफ्रिकेचा विस्फोटक खेळाडू आणि कर्णधार ए बी डिव्हिलिअर्ससाठी हा सामना ऐतिहासीक ठरला पण वेगळ्या कारणामुळे.   
 
पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज इमाद वसीमने 15 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डिव्हिलिअर्सला हफिजच्या हातू झेल देण्यास भाग पाडलं.  ए बी डिव्हिलिअर्सच्या कारकिर्दीत पहिल्याच चेंडुवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. डिव्हिलिअर्स 12 वर्षांच्या कारकिर्दित 221 सामने खेळला आहे. यातील 212 डावांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. पण यापुर्वी कधीच तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला नव्हता. याचा अर्थ असा नाही की डिव्हिलिअर्स शून्यावर बाद झाला नाही तो 7 वेळेस शून्यावर बाद झाला आहे.  
 
यापुर्वी पावसाचा व्यत्यय आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत बुधवारी पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 27 षटकांत 3 बाद 119 धावा केल्या होत्या. त्याच वेळेस पावसामुळे सामना थांबवावा लागला. त्या वेळेस डकवर्थ लुईस नियमानुसार या लक्ष्याचा पाठलाग करणाºया संघाला 100 धावांचे होते आणि पाकिस्तान संघ 19 धावांनी पुढे होता.
 
पावसामुळे खेळ थांबला तेव्हा शोएब मलिक 16 आणि बाबर आजम 31 धावांवर खेळत होते. फकहर झमन 31 आणि मोहंमद हाफीज 26 धावांवर बाद झाले होते. या दोघांनाही मोर्ने मॉर्कल याने तंबूत पाठवले. त्याआधी पाकिस्तानी गोलंदाजांनी जागतिक क्रमवारीत नंबर वनवर असणाºया दक्षिण आफ्रिकेला 8 बाद 219 धावांवर रोखले होते. त्यांच्याकडून डेव्हिड मिलरने एक चौकार व 3 षटकारासह सर्वाधिक नाबाद 75 धावा केल्या. ख्रिस मॉरीसने 28 व कागिसो रबादा याने 26 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. सलामीवीर क्विंटन डीकॉकने 33 धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन अली याने 24 धावांत 3 गडी बाद केले.