शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पाकचा विंडीजमध्ये प्रथमच मालिकाविजय

By admin | Published: May 16, 2017 1:24 AM

पाकिस्तानने तिसऱ्या व अखेरच्या क्रिकेट कसोटी सामन्यात सहा चेंडू शिल्लक असताना विंडीजविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.

रोसेयू : पाकिस्तानने तिसऱ्या व अखेरच्या क्रिकेट कसोटी सामन्यात सहा चेंडू शिल्लक असताना विंडीजविरुद्ध रोमांचक विजय मिळवला. वेस्ट इंडिजमध्ये पाकिस्तानने प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आणि निवृत्ती जाहीर करणारे दिग्गज फलंदाज मिसबाह-उल-हक व युनिस खान यांना शानदार निरोप दिला. वेस्ट इंडिजतर्फे रोस्टन चेसने नाबाद १०१ धावांची खेळी केली, पण संघाला ३०३ धावांचे लक्ष्य गाठून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ९३ धावांत सहा फलंदाज गमावले होते. त्यांचा डाव २०२ धावांत संपुष्टात आला. त्याआधी, पाकिस्तानच्या ३७६ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २४७ धावांची मजल मारली होती. पाकिस्तानने मालिकेत २-१ ने विजय मिळवला. पहिल्या डावात ६९ धावांची खेळी करणारा चेस सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.