ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ : बरोबर आजच्याच दिवशी ४१ वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली होती. सात जून ते २१ जून १९७५ या कालावधील ही स्पर्धा झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पहिली वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमध्ये भरवली होती. प्रुडेनशियल कंपनीने स्पर्धेला प्रायोजकत्व दिल्याने पहिला वर्ल्डकप प्रुडेनशियल वर्ल्डकप म्हणून ओळखला जातो.
क्रिकेटचा शोध कोणत्या साली लागला याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण इंग्लंडमध्ये वेल्स येथे असलेल्या घनदाट जंगलात लहान मुले हा खेळ खेळत होती, अशी नोंद सापडते. मात्र, सतराव्या शतकाच्या सुरवातीला तरूण हा खेळ खेळू लागले. पहिला आंतराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये खेळला गेला. त्यानंतर आजपर्यंत या खेळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या जगभरात जवळपास २० पेक्षा जास्त देशात हा खेळ खेळला जातो. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडीज, श्रीलंका, न्यूझीलंड या देशात हा खेळ सर्वांत जास्त खेळला जातो. आता या खेळात बांगलादेश, बर्मुडा, अफगानिस्तान, केनिया यासारख्या देशांनी चागंलाच रस दाखवला आहे.
क्रिकेटच्या खेळात अनेक बदल होत गेले आहेत, आणि खेळांडूबरोबर चाहत्यांनीही ते बदल स्विकारले आहेत. पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये अमेरिका व कॅनडात झाला. तर १८६४ मध्ये ओव्हरआर्म गोलंदाजी टाकण्यात येऊ लागली. १८७७ मध्ये पहिली कसोटी इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळली गेली. १८८२ मध्ये प्रतिष्ठेच्या अॅशेस करंडक सामन्यांना इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरवात झाली.
तर पहिला एकदिवस सामन्यास सुरवात झाल्यानंतर क्रिकेटकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि खेळात रुची वाढवण्यासाठी १९७५ मध्ये सर्वात प्रथम एकदिवसीय सामन्याच्या चषक जाहीर करण्यात आला. यामध्ये कसोटी खेळाणाऱ्या संघाना प्रथम स्थान देण्यात आले होते. तर श्रीलंका आणि पुर्व आशियाला पात्रता फेरी पार करावी लागली होती. यात एकून ८ संघाचा सहभाग करण्यात आला होता. ७ जुन १९७५ रोजी पहिला सामना खेळला गेला. पहिल्या विश्वचषकाच्या आयोजनाचा मान सर्व प्रथम इंग्लंडला मिळाला होता. पहिल्या विश्वचषकात सहभागी झालेले संघ होते, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज, भारत, पाकिस्तान, न्यू झीलँड (कसोटी खेळणारे संघ), श्रीलंका व पूर्व आफ्रिका.
आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक संघ आपल्या गटातील संघा बरोबर खेळणार होता. त्यातून पहिले दोन संघ उपांत्यफेरीत प्रवेश करणार असा स्पर्धेचा फॉरमॅट होता. त्यावेळी एकदिवसीय क्रिकेट ६० षटकांचे होते आणि सर्व संघांना एकच सफेद रंगाचा पोषाख होता. १९९२ वर्ल्डकपपासून क्रिकेटमध्ये रंगीत पोषाखाची सुरुवात झाली.
या विशवचषकात एकूण १५ सामने खेळले गेले होते. प्रत्येक सामना ६० षटकांचा असायचा. पहिला विषवचषक पटकावण्याचा मान वेस्टइंडिजला मिळला. जलदगती आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी ऑस्ट्रेलियाला पराभव केले होते. अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी वेस्टइंडिजने राउंड रॉबिन सामन्यात श्रीलंका, ऑस्ट्रेलियाला आणि पाकिस्तानचा पराभव करत उपांत्या सामन्यात पोहचला होता. त्यानंतर उपांत्यसामन्यात न्युझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली होती.
१९७५च्या वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी
ग्रुप ए मध्ये भारताच्या गटात इंग्लंड, न्यूझीलंड आणि पूर्व आफ्रिका हे संघ होते. पूर्व आफ्रिके विरुद्धचा सामना वगळता भारताने इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध सामना गमावल्याने प्राथमिक फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले. ग्रुप ए मधून इंग्लंड, न्यूझीलंड हे संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले.
ग्रुप बी मधून वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्यफेरीत पोहोचले.
२१ जून रोजी ऐतिहासिक लॉडर्सच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी करणा-या वेस्ट इंडिजने ६० षटकात २९१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव २७४ धावांवर संपुष्टात आला. अशा त-हेने वेस्ट इंडिजने १७ धावांनी विजय मिळवून पहिला वर्ल्डकप जिंकला.
या स्पर्धेत न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नरने सर्वाधिक ३३३ धावा केल्या. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमाऊरने सर्वाधिक ११ गडी बाद केले.