लाहौर : फिक्सिंगच्या आरोपानंतर तब्बल पाच वर्षांची शिक्षा पुर्ण करुन सलमान बट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर यांनी पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र त्यांच्या या पुनरागमावर पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांनी चांगलाच समाचार घेताना जोरदार टीका केली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) या खेळाडूंना सामावून घेतल्याने स्पर्धेच्या आणि पाकिस्तानच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो, असे मत राजा यांनी व्यक्त केले.याबाबतीत राजा म्हणाले की, या खेळाडूंनी जो गुन्हा केला आहे, त्यासाठी यांना माफ करु नये. मला या तिन्ही खेळाडूंना पीएसएलशी जोडलेले पाहण्याची इच्छा नाही. क्रिकेटच्या आदर्श स्वरुप आणि पाकिस्तानच्या छबीसाठी हे धोकादायक ठरु शकते. या तिन्ही खेळाडूंना सध्या नवोदितांसह सराव आणि इतर सुविधा उपलब्ध होत असून यावर देखील राजा यांनी टीका केली. राजा म्हणाले की, स्पर्धेत ज्यावेळी पैसा येतो तेव्हा भ्रष्टाचाराची शक्यताही वाढते. मात्र उच्च व्यवस्थापन आणि आयोजकांची क्षमता याजोरावर अशा परिस्थितींवर नियंत्रण ठेवू शकतो. (वृत्तसंस्था)
फिक्सर खेळाडू नकोत
By admin | Published: September 23, 2015 11:08 PM