शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"मीही पद्मश्री परत करतो", वीरेंद्र सिंहचा कुस्तीपटूंना पाठिंबा, सचिनसह नीरज चोप्रालाही केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 17:01 IST

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली अन् संजय सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली अन् संजय सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर वादाला तोंड फुटले आहे. निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह (WFI Chief Sanjay Singh) यांच्या विजयानंतर काही कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकला आहे. तर बजरंग पुनियाने आपला पद्म पुरस्कार परत केला आहे. अशातच पैलवान वीरेंद्र सिंहने देखील आक्रमक पवित्रा घेत पद्म पुरस्कार माघारी करणार असल्याची घोषणा केली. 

साक्षी मलिकच्या कुस्ती सोडण्याच्या निर्णयाचे वीरेंद्र सिंहने समर्थन केले असून पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले. खरं तर माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांचा सहकारी कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे दुखावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. साक्षी आणि इतर खेळाडूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

पद्मश्री परत करणार - वीरेंद्र सिंहआता पैलवानांच्या समर्थनार्थ वीरेंद्र सिंहने आवाज उठवला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "मी माझी बहीण आणि देशाच्या लेकीसाठी पद्मश्री देखील परत करीन. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, मला तुमच्या मुलीचा आणि माझी बहीण साक्षी मलिकचा अभिमान आहे. पण मी देशातील आघाडीच्या खेळाडूंनाही आवाहन करेन की, त्यांनी देखील त्यांचा निर्णय घ्यावा." सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करत वीरेंद्र सिंहने ही माहिती दिली. कुस्तीपटू बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पद्मश्री परत करण्यासाठी पत्र लिहल्यानंतर वीरेंद्र सिंहने ही पोस्ट केली. 

पैलवानांच्या आक्रमक पवित्र्यानंतर ब्रीजभूषण शरण सिंह यांनी म्हटले, "काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या या कुस्तीपटूंसोबत देशातील एकही कुस्तीपटू नाही. ते विरोध करत आहेत, त्यांच्या विरोधामुळे मी आता फाशी घेऊ का?  गेले ११ महिने आणि तीन दिवस चाललेल्या ग्रहणाचा फटका कुस्तीला बसला होता. आता निवडणुका झाल्या आणि जुन्या महासंघाचा पाठिंबा असलेला उमेदवार म्हणजेच आमचे समर्थक उमेदवार संजय सिंह उर्फ ​​बबलू विजयी झाले. विजय सुद्धा ४० ते ७ अशा फरकाने झाला. आता आमचे ध्येय कुस्तीचे काम पुढे नेण्याचे आहे." 

टॅग्स :Wrestlingकुस्तीbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार