नाडकर्णी चषक फुटबॉल स्पर्धा : गतविजेत्या मुंबई टायगर्स, मुंबई सिटी यांची माघार; बक्षीस-रकमेत दुपटीने वाढ
मुंबई : मुंबईतील जुन्या फुटबॉल स्पध्रेपैकी एक नाडकर्णी चषक स्पध्रेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल अॅण्ड फर्टिलायझर (आरसीएफ) मैदानावर होत असलेल्या या स्पध्रेत 16 संघांचा समावेश आहे. 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत पार पडणा:या या स्पध्रेत बक्षीस-रकमेतही दुपटीने वाढ करण्यात आली आहे. विजेत्या संघाला 1 लाख रुपये रोख, तर उपविजेत्या संघाला 5क् हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहेत.
मात्र, यंदाच्या स्पध्रेत गतविजेत्या वाशीच्या मुंबई टायगर्स संघासह भारतीय नौदल, मुंबई एफसी संघांचा सहभाग नसेल, अशी माहिती मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे (एमडीएफए) सचिव उदयन बॅनर्जी यांनी दिली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर कंदारकर यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती. बॅनर्जी म्हणाले, स्पध्रेत 17 एलिट लीग संघांपैकी भारतीय नौदलाने यंदा खेळण्यास नकार दिला आहे. तसेच गतविजेते मुंबई टायगर्स यांनीही काही अडचणींमुळे माघार घेतल्याचे कळवले. आय लीग व फेडरेशन चषक स्पर्धाच्या तयारीकरिता मुंबई एफसीनेही नकार दिला असला तरी मुंबई एफसीचा 19 वर्षाखालील संघ स्पध्रेत उतरेल.
एमडीएफएच्या स्पर्धामध्ये अनेकदा मान्यताप्रात्प रेफरी नसतात. यावर छेडले असता कंदारकर म्हणाले, गेल्या 4-5 वर्षापासून रेफरीची समस्या सतावत आहे. सद्य:स्थितीला आमच्याकडे असलेल्या रेफरींपैकी अनेकांकडे मान्यताही नाही. पण हा प्रश्न लवकरच सुटेल. (क्रीडा प्रतिनिधी)
च्यजमान राष्ट्रीय केमिकल अॅण्ड फर्टिलायझर (आरसीएफ) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (सीबीआय) या दोन तगडय़ा संघांमध्ये पहिला मुकाबला होणार आहे. त्यापाठोपाठ युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय) विरुद्ध कॉपेनेरस यांच्यात लढत होईल.
च्दिवसाला दोन सामने होणार असून, बाद फेरीत ही स्पर्धा पार पडेल. गतउपविजेते एअर इंडिया 29 नोव्हेंबरला केएसएविरुद्ध स्पध्रेतील सुरुवात करतील.