शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सीमावर चार वर्षांची बंदी डोपिंग नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 1:21 AM

नवी दिल्ली : राष्ट्रकुल चॅम्पियनशिप भारोत्तोलन स्पर्धेत रौप्य विजेती भारतीय खेळाडू सीमा हिच्यावर डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांची ...

नवी दिल्ली : राष्ट्रकुल चॅम्पियनशिप भारोत्तोलन स्पर्धेत रौप्य विजेती भारतीय खेळाडू सीमा हिच्यावर डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीने (नाडा) यंदा विशाखापट्टणम येथे झालेल्या ३४ व्या महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेदरम्यान सीमाचे डोप नमुने परीक्षणासाठी घेतले होते. वृत्तानुसार चॅम्पियनशिपदरम्यान गोळा करण्यात आलेल्या नमुन्यात प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. हे पदार्थ कामगिरी उंचावण्यासाठी घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बनवाबनवी आणि डोपिंग नियमांचे उल्लंघन असल्याचा निष्कर्ष नाडाने काढला आहे.नमुन्यात हायड्रॉक्सी-४, मिथॉक्सी टेमोक्सिफेन, सिलेक्टिव्ह अ‍ॅस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलर, अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉईड, आदी पदार्थ आढळून आले. हे सर्व पदार्थ वाडाच्या २०१९ च्या प्रतिबंधित औषधांच्या यादीत आहेत. नाडाच्या डोपिंगविरोधी शिस्तपालन समितीपुढे झालेल्या सुनावणीवेळी सीमाने समाधानकारक उत्तरे न दिल्याने तिच्यावर पुढील चार वर्षांची बंदी घालण्यात आली. सीमाने २०१७ च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपचे रौप्य जिंकले होते. २०१८ च्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत ती ७५ किलो गटात मात्र सहाव्या स्थानी राहिली होती.यापूर्वी आशियाई रौप्यपदक विजेता मुष्ठीयोद्धा सुमित संगवान याच्यावरही डोपिंग प्रकरणी कारवाई केली आहे. सुमितवर नाडाने एक वर्षाची बंदी घातली आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेला सुमित संगवान ९१ किलो वजन गटातून खेळतहोता. आॅलिम्पिक पात्रता फेरीत तो खेळणार होता. त्यापूर्वीच त्याच्यावर बंदी घालण्यात आली. (वृत्तसंस्था)