शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

चौथ्या दिवशी भारताची पाच पदके निश्चित, ज्योती, अंकुशिता, शशी, नीतू, साक्षी उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 4:04 AM

गुवाहाटी : ज्योती गुलिया, अंकुशिता बोरो, शशी चोप्रा, नीतू घनघास, साक्षी चौधरी यांनी येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंगच्या चौथ्या दिवशी उपांत्य फेरीत धडक देताच भारताची पाच पदके निश्चित झाली.

गुवाहाटी : ज्योती गुलिया, अंकुशिता बोरो, शशी चोप्रा, नीतू घनघास, साक्षी चौधरी यांनी येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंगच्या चौथ्या दिवशी उपांत्य फेरीत धडक देताच भारताची पाच पदके निश्चित झाली. याशिवाय नेहा यादव आणि अनुपमा यांना स्पर्धा सुरू होण्याआधीच थेट उपांत्य फेरीत स्थान मिळाल्यामुळे किमान सात पदके भारताच्या खात्यात येतील, यावर आज शिक्कामोर्तब झाले.नवीनचंद्र बारडोलाय इनडोअर स्टेडियममध्ये बुधवारी वेल्टर (६९ किलो) गटात आस्था पाहवा हिला चुकांमुळे तुर्कस्थानची ओलतू कन्सेर हिच्याकडून ३-२ असा पराभवाचा धक्का बसला, तर मिडलवेट (७५ किलो) गटात निहारिका गोने तांत्रिकदृष्ट्या तुलनेत वरचढ ठरलेली इंग्लंडची जॉर्जिया ओकोनेरकडून उपांत्यपूर्व लढतीत ५-० ने पराभूत झाली.६४ किलोच्या उपांत्यपूर्व सामन्यात अंकुशिताने इटलीची नोकोली रेबेका हिच्याकडून बल्गेरियातील सोफिया येथे झालेल्या पराभवाचा वचपा काढताना ३-२ असा विजय साजरा केला.अंकुशिताच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच भारतीय संघाचे मुख्य कोच राफेल बर्गामास्को यांनी हवेत हात उंचावून आनंद साजरा केला. ५७ किलो गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत भारताच्या शशी चोप्राने कझाकिस्तानची अबिलखान सांदूगाशवर ५-० असा विजय नोंदविला.ज्योतीने खास शैलीत पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठली. प्रतिस्पर्धी खेळाडूला सारखे चकवून तिन्ही फेºयांमध्ये ज्योतीने ठोशांचा प्रहार करीत वर्चस्व गाजविले. ‘कोचने मला सारखे हलत राहण्याचा सल्ला दिला होता. दुसºया आणि तिसºया फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूने मला पकडण्याचा प्रयत्न करताच मी डावपेच बदलून आक्रमक झाले. त्याचा विजयात लाभ झाला,’ असे ज्योतीने सांगितले.अंकुशिता उपांत्य फेरीत रेफ्रींमध्ये ३-२ असे मतविभाजन झाल्यावर नाराज होती. पण प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध पराभवाचा वचपा काढल्याचा आंनद तिच्या चेहºयावर दिसला. ‘ही लढत इतकी कठीण होईल, अशी अपेक्षा नव्हती. मी विजयी होईल, असा विश्वास होता,’ असेही ती म्हणाली.शशीची गाठ कझाकिस्तानची मुरब्बी बॉक्सर अबिलखानविरुद्ध होती. पुढची खेळाडू तांत्रिकदृष्टया भक्कम आणि तंदुरुस्त आहे, हे ध्यानात ठेवून शशीने सावध पाऊल टाकले. नेहमीचे थेट ठोसे अलगद प्रभावी ठरल्याने शशी चोप्राची सरशी झाली.‘‘मी अबिलखानकडून इस्तंबूलमध्ये पराभूत झाल्याने मला प्रतिस्पर्धी खेळाडूचे डावपेच कळले होते. त्यादृष्टीने दुसºया आणि तिसºया फेरीत कोचच्या टिप्स कृतीत आणल्या. दुसºया फेरीत अधिकाधिक गुणांंची कमाई करीत विजय निश्चित केला होता. तिसºया फेरीत बचावावर भर देत विजय साकार केला,’’ असे विजयानंतर शशीने सांगितले.>नीतूकडून जर्मनीची मॅक्सी क्लोझर पराभूत४५ ते ४८ किलो लाईट फ्लाय गटात नीतू घनघास हिने जर्मनीची मॅक्सी क्लोझर हिला ५-० ने धक्का देत उपांत्य फेरी गाठली. साक्षी चौधरीने बँटमवेट गटाच्या उपांत्यपूर्व (५४ किलो) लढतीत चीनची बलाढ्य बॉक्सर झिया लू हिला सलग तीनदा रिंगणात रक्तबंबाळ करताच रेफ्रीने हरियानाच्या साक्षीच्या बाजूने एकतर्फी निकाल दिला.जर्मनीच्या मॅक्सी क्लोझरला भारताची नीतू घनघास उजव्या हाताने ठोसा मारताना.

टॅग्स :boxingबॉक्सिंग