French Open Final: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनं ( Novak Djokovic) रविवारी फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर करताना ग्रँड स्लॅम जेतेपदाची संख्या 19 वर नेली. 2019नंतर जोकोव्हिचनं फ्रेंच ओपन जिंकण्याचा पराक्रम केला. ओपन एरात ( Open Era) चारही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा दोनवेळा जिंकणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला. अंतिम लढतीत नोव्हाकनं ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सीपासचा 6-7 ( 6/8), 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा पराभव केला. या विजयानंतर नोव्हाकनं विजेतेपदाचा रॅकेट एका 12 वर्षीय मुलाला भेट म्हणून दिला आणि त्यानंतर त्या मुलाच्या आनंदासमोर गगनही ठेंगणे वाटू लागले होते. सोशल मीडियावर सध्या नोव्हाकच्या या अनमोल भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ( Novak Djokovic said he gave away his racquet that won him the Roland Garros 2nd time to a 12-year-old boy)
French Open 2021 Final : सामन्याच्या पाच मिनिटांआधी कुटुंबातील व्यक्तीचं झालं निधन, तरीही तो कोर्टवर उतरला अन्...
कोण आहे हा मुलगा?नोव्हाक जोकोव्हिच अंतिम सामन्यात 0-2 असा पिछाडीवर होता आणि त्यानंतर त्यानं जबरदस्त कमबॅक करून बाजी मारली. महान फलंदाज सचिन तेंडुलकरपासून ते अनेक दिग्गजांनी नोव्हाकच्या या कमबॅकचे भरभरून कौतुक केले. पण, नोव्हाकला हे जेतेपद त्या 12 वर्षीय मुलामुळे मिळाले आहे. नोव्हाकनं सामन्यानंतर स्वतः याबद्दल सांगितले.
34 वर्षीय नोव्हाकनं यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.