शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

Leon Marchand, Paris Olympics 2024: दोन तासांत दोन सुवर्णपदके! फ्रान्सच्या जलतरणपटूने केली ४८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 5:00 PM

Swimmer Leon Marchand, Paris Olympics 2024: २२ वर्षीय फ्रेंच जलतरणपटू लिओन मॅचॉनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली.

Swimmer Leon Marchand, Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात तीन कांस्यपदके मिळवली. पण यंदाच्या जलतरण स्पर्धेत एक पदक जिंकण्याचा अनोखा विक्रम पाहायला मिळाला. प्रसिद्ध ऑलिम्पिक जलतरणपटू मायकेल फेल्प्सचे माजी प्रशिक्षक बॉब बोमन यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या लिओन मॅचॉनने या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत ३ पदके जिंकली आहेत. पण चर्चा एका वेगळ्याच पराक्रमाची आहे. २२ वर्षीय फ्रेंच जलतरणपटू लिओन मॅचॉनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली. तब्बल ४८ वर्षांनी त्याने हा पराक्रम करून दाखवला.

जलतरणपटूने रचला इतिहास

लिओन मॅचॉनने एक अतिशय संस्मरणीय कामगिरी केली. त्याने २०० मीटर बटरफ्लाय आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक पटकावले. १९७६ नंतर पहिल्यांदाच एका जलतरणपटूने ऑलिम्पिक स्पर्धेत एकाच दिवशी दोन सुवर्णपदके जिंकली. त्याने हंगेरीचा सध्याचा चॅम्पियन आणि जागतिक विक्रमवीर क्रिस्टोफ मिलाकचा पराभव करून २०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याच वेळी, त्याने २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये २:०५.८५च्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. याशिवाय, जलतरणात तीन सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला फ्रेंच खेळाडू ठरला.

फ्रान्समधील टूलूस येथे जन्मलेल्या लिओन मॅचॉन याचे वडील झेवियर यांनी १९९६ मध्ये अटलांटा गेम्स आणि २००० मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले होते. अटलांटा १९९६ मध्ये झेवियर २००० मीटर वैयक्तिक मेडल लिस्टमध्ये ८व्या स्थानावर होते. तर सिडनी २००० मध्ये ते ७व्या स्थानी होते. लिओन मॅचॉनची तुलना अनेकदा मायकेल फेल्प्सशी केली जाते. याशिवाय, लिओन मॅचॉनची आई सेलीनने बार्सिलोना या १९९२ मध्ये चार स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या होत्या. २०० मीटर वैयक्तिक शर्यतीत त्या १४व्या स्थानी होत्या.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Franceफ्रान्सSwimmingपोहणे