चेन्नई : आॅलिम्पिक पदकविजेता नेमबाज गगन नारंग याने युवा नेमबाजांसाठी ‘प्रोजेक्ट लीप’ शिबिरानुसार येथे रामचंद्र विश्वविद्यालयात आज प्रशिक्षण शिबिराची सुरुवात केली.या योजनेनुसार देशातील विविध विभागांतून निवडण्यात आलेल्या १२ रायफल नेमबाजांना विश्वविद्यालय परिसरातील सेंटर फॉर स्पोर्टस् सायन्स (सीएसएस)मध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘प्रोजेक्ट लीप’ने या योजनेसाठी सीएसएसशी करार केला आहे.‘प्रोजेक्ट लीप’ नारंगची महत्त्वाकांक्षी योजना गगन नारंग खेल विकास संस्थानचा एक भाग आहे. त्यानुसार देशातील विविध क्षेत्रांतील युवा आणि प्रतिभावान नेमबाजांना प्रशिक्षण दिले जाते. ‘प्रोजेक्ट लीप’नुसार निवडण्यात आलेल्या नेमबाजांना स्लोवाकियाचे प्रशिक्षक एंटोन बेलाक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी होतील.
गगन नारंगचे युवा नेमबाजांसाठी शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 8:27 PM