मेलबर्न : क्रिकेटविश्वातील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने बिग बैश टी-२० क्रिकेट स्पर्धेत वादळी खेळी करताना वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. भारताचा धडाकेबाज युवराज सिंग याने २००७ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत केवळ १२ चेंडूत अर्धशतक झळकावत विश्वविक्रम केला होता. गेलने देखील १२ चेंडूत अर्धशतक झळकावताना युवीच्या विक्रमाशी बरोबरी केली.आॅस्टे्रलियात सुरु असलेल्या बिग बैश स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स विरुध्द अॅडिलेड स्ट्राइक सामन्यात गेल वादळ धडकले. मेलबर्न संघाकडून खेळताना क्रिकेटचा ‘गॉडझिला’ गेल याने डावातील पहिल्याच षटकातील अखेरचे चार चेंडू मैदानाबाहेर भिरकावून देत पुढील वादळाचा इशारा दिला. यानंतर त्याने आपला हिसका सुरुच ठेवताना टे्रविस हेड टाकत असलेल्या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून १२ चेंडूत धमाकेदार अर्धशतक पुर्ण केले. गेलने केवळ १७ चेंडूत ५६ धावांचा चोप देताना दोन चौकार आणि ७ षटकार खेचले.
मेलबर्नला धडकले ‘गेल’ वादळ
By admin | Published: January 19, 2016 3:33 AM