शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गंभीर - उथप्पाची दमदार फलंदाजी, केकेआरने जिंकली दिल्ली

By admin | Published: April 28, 2017 7:37 PM

कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबीन उथप्पा या जोडीने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर केकेआरने दिल्लीवर सात विकेटने विजय मिळवला

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 28 - कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबीन उथप्पा या जोडीने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर केकेआरने दिल्लीवर सात विकेटने विजय मिळवला. दिल्लीने दिलेले 161 धावांचे आव्हान केकेआरने 22 चेंडू राखून पार केले. या विजयाचा शिल्पकार कर्णधार गौतम गंभीर ठरला. गंभीरने 52 चेंडूत नाबाद71 धावांची खेळी केली, तर रॉबीन उथप्पाने 33चेंडूत 59 धावा ठोकल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. कोलकाताने तीन षटके शिल्लक ठेवून दिल्लीचे 161 धावांचे आव्हान गाठले आणि सात विकेट्सने विजय साजरा केला. त्यापूर्वी, संजू सॅमसन आणि श्रेअस अय्यर यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात सहा बाद 160 धावा केल्या. संजू सॅमसनने 38 चेंडूत तीन षटकार आणि सहा चौकाराच्चा मदतीने 60 धावा केल्या. करुण नायर आणि संजूने पहिल्या विकेट साठी 4.5 षटकात 48 धावांची सलामी दिली. करुण नायर बाद झाल्यनंतर श्रेअस अय्यरने संजू सॅमसनला सुरेख साथ देताना धावगती वाढवली. श्रेअस अय्यरने 34 चेंडूत 47 धावांची खेळी केली, या खेळीदरम्यान त्याने 1 षटकार आणि चार चौकार लगावले. पंथ, अँडरसन, मॉरीस हे आज पुन्हा एकदा अपयशी ठरले. शेवटच्या पाच षटकात दिल्लीकरांना फक्त 30 धावा करता आल्या. हाणामारीच्या षटकात दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे दिल्लीची धावसंख्या मर्यादित राहिली. कोलकात्याकडून कुल्टर नाइलने 3 बळी मिळवले.