ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि, २८ - भारत वि. श्रीलंका तिस-या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला असून भारताने १५ षटकांत २ गडी गमावून ५० धावा केल्या आहेत.
तिस-या कसोटीत विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या इराद्याने फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघातील के. एल. राहुल (२) व अजिंक्य रहाणे (८) स्वस्तात बाद झाल्याने भारताला सुरूवातीलाच दोन धक्के बसले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (१४) व पुजारा (१९) खेळत असतानाचा पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. श्रीलंकेतर्फे प्रसाद व प्रदीपने प्रत्येकी १ बळी टिपला.