अजय नायडू
‘मेमसाब’ हे नॉटिंघमच्या हृदयस्थळी वसलेले इंडियन रेस्टॉरेंट! गुरुवारच्या सायंकाळी येथे ग्लॅमर आणि झगमगाट यांचा संगम पहायला मिळाला. महान कसोटीपटू सुनील गावसकर यांच्या 65 व्या वाढदिवसाचा कार्यक्रम याच ठिकाणी झाला. याप्रसंगी जे महान खेळाडू उपस्थित होते त्यात सर ज्योफ बायकॉट, इयान बोथम, कपिलदेव, वासिम आक्रम, मार्क निकोलस आणि माइक प्रॉक्टर आदी दिग्गजांचा समावेश होता.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सनी म्हणाले, ‘मी येथे कसोटी सामने खेळलो नाही, पण नॉटिंघमशी माङया अनेक आठवणी जुळल्या आहेत. येथे माङो काही चांगले मित्र आहेत. लंडन नेहमी व्यस्त.. व्यस्त आणि व्यस्त असते पण येथे कसे शांत आणि सुखावह वाटते. हे मजेदार शहर आहे. ट्रेंटब्रीज मैदानाशेजारीच नदी आहे.’
जुन्या प्रतिस्पध्र्यासोबत ही रम्य सायंकाळ आनंद देणारी आहे. आता हे सर्वजण माङो मित्र बनले आहेत. मला वाटते हा विशेष सोहळा आहे. खेळाच्या मैदानावर आपण हाडवैरी असतो, पण खेळ संपताच मित्र बनतो हीच या खेळाचे सौंदर्य वाढविणारी बाब ठरावी.’ नॉटिंघमच्या पहिल्या कसोटीबद्दल सनीचे मत असे की, ‘ट्रेंटब्रीजची खेळपट्टी गोलंदाजांसाठी निर्जीव आहे. या खेळपट्टीवर गडी बाद करणो त्यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरावी. ’
या पार्टीत आपला मुलगा तैमूर
याच्यासोबत सहभागी झालेला वासिम आक्रम म्हणाला, ‘क्रिकेटशिवाय गेल्या काही दिवसांत येथे सर्व काही सुरळीत पार पडले. भेट देण्यासाठी ट्रेंटब्रीज ही परफेक्ट जागा आहे, पण ही टिपिकल ट्रेंटब्रीज विकेट नाही. काहीवेळा ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी पूरक असते तर काही वेळा निर्जीव ठरते. क्रिकेटचा हा भाग आहे.’ मेमसाब रेस्टॉरेंटच्या मालकीण अमिता साहनी म्हणाल्या, ‘आमच्याकडे दररोज खेळाडू येत असतात. सामना सुरू होण्याच्या तीन दिवस आधी धोनी, विजय आणि इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन हे येऊन गेले.’