शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

गेल, हसीचा विक्रम कोहलीच्या आवाक्यात

By admin | Published: May 09, 2016 12:05 AM

आपल्या तुफान फॉर्मच्या जोरावर सध्या क्रिकेटविश्व गाजवणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हळूहळू विविध विश्वविक्रम पादाक्रांत करीत आहे

नवी दिल्ली : आपल्या तुफान फॉर्मच्या जोरावर सध्या क्रिकेटविश्व गाजवणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हळूहळू विविध विश्वविक्रम पादाक्रांत करीत आहे. आयपीएलमध्येही त्याने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावल्या असून, एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेल आणि मायकल हसी यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी यंदा कोहलीला आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असलेल्या कोहलीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ८ सामन्यांतून ९०.१६च्या जबरदस्त सरासरीने ५४१ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये कोहलीने दोन शतके आणि चार अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याचबरोबर यंदा त्याने दोन शतके झळकावताना आयपीएल इतिहासात एकाच मोसमात एकापेक्षा अधिक शतके झळकावणारा पहिला फलंदाज म्हणूनही मान मिळवला आहे. विराटने राइजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध नाबाद १०८ धावा कुटताना स्पर्धेत वैयक्तिक ५०० धावांचा पल्ला गाठला. सध्या कोहली ज्या फॉर्ममध्ये आहे त्याकडे बघताना तो आयपीएलच्या एकाच सत्रात सर्वाधिक ७३३ वैयक्तिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकतो. तसेच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळलेल्या आॅस्टे्रलियाच्या मायकल हसीने देखील ७३३ धावा काढल्या होत्या. गेल व हसी यांनी अनुक्रमे २०१२ व २०१३ साली ही कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये कोहलीने २०१३मध्ये ६३४ धावा फटकावल्या होत्या. विशेष म्हणजे कोहली फक्त आयपीएलमध्येच नाही तर याआधी २०१६च्या सुरुवातीपासून चार महिन्यांत झालेल्या टी-२० सामन्यांतही तुफान फॉर्ममध्ये होता. कोहलीने यंदाच्या वर्षी आतापर्यंत १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२५ च्या सरासरीने ६२५ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने ७ वेळा अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या वर्षी आतापर्यंत एकूण २१ टी-२० सामन्यांतून कोहलीने ११६६ धावा काढल्या आहेत. (वृत्तसंस्था)>>> आशिया चषक स्पर्धेत कोहलीने ७, ४९, नाबाद ५६ आणि नाबाद ४१ धावा केल्या. स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या भारताच्या यशात कोहली निर्णायक ठरला होता.घरच्या मैदानावर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली होती.टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोहलीने २३, नाबाद ५५, २४, नाबाद ८२ आणि नाबाद ८९ अशी खेळी करून भारताला उपांत्य फेरीत नेले.हाच फॉर्म आयपीएलमध्ये कायम राखताना कोहलीने राजकोटला गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद १०० धावा करून पहिले टी-२० शतक झळकावले. तर दोन सामन्यांनंतर पुन्हा एकदा शतक झळकावताना कोहलीने दुसरे टी-२० शतक झळकावले.