शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कॅमेरूनला हरवून जर्मनी उपांत्य फेरीत

By admin | Published: June 27, 2017 12:50 AM

विश्वविजेत्या जर्मन फुटबॉल संघाने कॅमेरूनवर ३-१ ने सरशी साधून कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.

सोची (रशिया) : विश्वविजेत्या जर्मन फुटबॉल संघाने कॅमेरूनवर ३-१ ने सरशी साधून कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. स्पर्धेच्या ब गटात जर्मनीने रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात द. आफ्रिका कप आॅफ नेशन्स चॅम्पियन्स कॅमेरूनला पराभूत करीत अव्वल स्थानावर झेप घेतली.पूर्वार्धातील खेळात उभय संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले. तथापि, उत्तरार्धात खेळ सुरू होताच तिसऱ्या मिनिटाला केरेम डेर्मिबे याने जर्मनीसाठी शानदार गोल नोंदवत खाते उघडले. एक गोलने माघारताच कॅमेरूनचे खेळाडू आक्रमक झाले. या संघाचा बचाव फळीतील खेळाडू अर्नेस्ट माबुका याला नियमबाह्य खेळ केल्याबद्दल रेफ्रीने ६४ व्या मिनिटाला ‘रेड कार्ड’ दाखवीत मैदानाबाहेर केले. याचा लाभ घेत तीन मिनिटांनंतर जर्मनीकडून टिमो वॉर्नर याने दुसरा गोल नोंदविला.कॅमेरूनच्या खेळाडूंची देखील गोल नोंदविण्याची धडपड कायम होती. तब्बल ७९ मिनिटांचा खेळ झाल्यानंतर त्यांना यश आले. आक्रमक विन्सेंट अबुबाकर याने सहकाऱ्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळवून दिली; पण कॅमेरूनचा आनंद क्षणिक टिकला. खेळ संपायला नऊ मिनिटांचा अवधी असताना वॉर्नरने स्वत:चा दुसरा आणि संघाचा तिसरा गोल करीत संघाचा विजय निश्चित केला. कमेरून स्पर्धेबाहेर पडला, तर जर्मनीला ब गटात सात गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेता आली. जर्मनीची उपांत्य फेरीत गाठ ‘अ’ गटातील उपविजेत्या मेक्सिकोविरुद्ध २९ जून रोजी पडणार आहे. (वृत्तसंस्था)