शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

जर्मनीच जगज्जेता

By admin | Published: July 14, 2014 3:18 AM

फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर १-० ने मात करत जर्मनीने जगज्जेतेपद पटकावले. जर्मनीने चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे.

 ऑनलाइन टीम

रियो दि जानेरो, दि. १४- फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर १-० ने मात करत जर्मनीने जगज्जेतेपद पटकावले. सामना संपण्यासाठी सात मिनीटे शिल्लक असताना जर्मनीच्या मारिओ गोएत्झने गोल मारुन २४ वर्षांनंतर विश्वचषकावर संघाचे नाव कोरले. 

फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये रविवारी जर्मनी विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात सामना रंगला. यजमान ब्राझीलला ७-१ ने धूळ चारुन फायनलमध्ये पोहोचलेल्या जर्मनीचा आत्मविश्वास दुणावला होता. तर नेदरलँडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात करुन लिओनल मेस्सीचा अर्जेंटिना संघ फायनलपर्यंत पोहोचला होता. अंतिम सामन्यात बलाढ्य जर्मनीला रोखण्याचे आव्हान अर्जेंटिनासमोर होते. पहिल्या हाफमध्ये जर्मनीकडेच बॉलचा ताबा जास्त वेळ असला तरी अर्जेंटिनानेही जर्मनीला गोल करण्याची संधीच दिली नाही. अर्जेंटिनाचा मेस्सी तर जर्मनीचा म्यूलर हे दोघेही गोल करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र गोलपोस्टजवळ पोहोचताच बचाव फळीतील खेळाडू दोघांनाही रोखत होते. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाच्या हिग्यूएनने एक गोल केला खरा मात्र पंचांनी तो ऑफसाइड ठरवत अपात्र ठरवला. गोल मारल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणा-या अर्जेंटिनाचे खेळाडू व पाठिराख्यांच्या आनंदावर अवघ्या काही क्षणात पाणी फेरले. 

दुस-या सत्राची सुुरुवात होताच ४६ व्या मिनीटाला लिओनेल मेस्सी चपळपणे चेंडू जर्मनीच्या गोलपोस्टपर्यंत नेला. मात्र त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात मेस्सीला अपयश आले. यानंतर ५० आणि ५७ व्या मिनीटाला अर्जेंटिनाने लागोपाठ दोनदा आक्रमणाचा प्रयत्न केला. मात्र त्यांना गोल करण्यात अपयशच येत होते. अर्जेंटिनाच्या आक्रमक पवित्र्यामुळे जर्मनीचा संघ काहीसा बॅकफूटवर गेल्याचे दिसत होते. मात्र अवघ्या काही मिनीटांमध्ये यातून उभारी घेत जर्मनीनेही आक्रमकपणे अर्जेंटिनाच्या गोलपोस्टच्या दिशेने आगेकूच सुरु केली. मात्र अर्जेंटिनाच्या भक्कम तटबंदीने त्यांना रोखून ठेवले होते. ९० मिनीटांचा खेळ संपल्यावरही दोन्ही संघांना गोल मारता आला नाही.

अखेरीस सामन्यात अतिरिक्त ३० मिनीटांचा वेळ देण्यात आला. यंदाच्या विश्वचषकात अतिरिक्त वेळ दिलेला हा आठवा सामना होता. अतिरिक्त वेळेत जर्मनीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अतिरिक्त वेळेतील पहिल्याच मिनीटात जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्जेंटिनाचा गोलकिपर रोमेरोने उत्कृष्ट बचाव करत जर्मनीचे प्रयत्न उधळून लावले.  १०० व्या मिनीटाला अर्जेंटिनाच्या पॅलासिओला गोल करण्याची नामी संधी होती. मात्र त्याने ही संधी दवडली. सामना संपायला सात मिनीटे शिल्लक असताना म्हणजेच ११३ व्या मिनीटाला जर्मनीचा बदली खेळाडू गोएत्झने अप्रतिम गोल मारुन संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे जर्मनीचा विजय जवळपास निश्चित समजला जात होता. सामना संपायला दोन मिनीटे शिल्लक असताना अर्जेंटिनाला फ्रि किक मिळाली होती. या किकवर गोल करण्यात मेस्सी अपयश आले आणि जर्मनीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

पुरस्कारांचे मानकरी 

> गोल्डन बूट - जेम्स रॉॅड्रीग्ज ( ६ गोल, कोलंबिया)

> गोल्डन ग्लोव्ह - मॅन्युअल न्यूअर (गोलकिपर, जर्मनी) - २५ सेव्ह

> गोल्डन बॉल - लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)

> फिफा फेअर प्ले अॅवॉर्ड - कोलंबिया संघ

> फिफा यंग प्लेअर अॅवॉर्ड - पॉल पोग्बा (फ्रान्स)

> फिफा सर्वोत्कृष्ट धावपटू - थॉमस म्यूलर ८३, ९५७ मीटर (सुमारे ८३ किलोमीटर)

 

सामन्याची वैशिष्ट्ये

> दक्षिण अमेरिका खंडात विश्वचषक जिंकणारा जर्मनी हा पहिला युरोपियन देश बनला आहे.

> जर्मनी २००२ च्या फायनलमध्ये हरली होती. तर २००६ आणि २०१० च्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरीस २०१४ मध्ये त्यांना विश्वचषकावर नाव कोरता आले. 

जर्मनीचे हे चौथे विश्वविजेतेपद आहे. यापूर्वी १९५४, १९७४ आणि १९९० च्या विश्वचषकात त्यांना विजय मिळाला होता.

> साखळी फेरीत गोल मारुन संघाला विजय मिळवून देणा-या लिओनेल मेस्सीला उपांत्यपूर्व, उपांत्य आणि फायनल अशा चार सामन्यांमध्ये एकही गोल करता आला नाही. 

> विश्वचषकात सर्वाधिक गोल करणा-या मिरास्लॅव्ह क्लोसचा (चार विश्वचषकात १६ गोल) याचा हा शेवटचा सामना होता. या सामन्यानंतर क्लोसने निवृत्ती जाहीर केली आहे. 

> संयुक्त जर्मनीचे हा पहिलेच विश्वचषक विजेतेपद आहे. 

> जर्मनी विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा संघ बनला आहे. या विश्वचषकात जर्मनीने तब्बल ७ सामन्यांमध्ये १८ गोल केले. तर एकूण सर्व विश्वचषक मिळून जर्मनीने २२२ गोल केले आहेत. ब्राझीलने आत्तापर्यंत २२० गोल केले आहेत. 

> जर्मनीचे प्रशिक्षक जोकोलिम लो यांनी अखेर संघाला विजय मिळवून दिला. २००८ मधील यूरो कपच्या फायनलमध्ये, २०१० मध्ये सेमीफायनल आणि २०१२ च्या सेमीफायनलमध्ये जर्मनीचा पराभव झाल्याने लो यांना टीकेचा सामना करावा लागला होता.