ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. २९ - जर्मन फुटबॉल संघाचा कर्णधार बास्टीयन श्वेनस्टायगरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. श्वनेस्टायगर इंग्लिश फुटबॉल क्लब मॅंचेस्टर युनायटेडकडून खेळायचा. श्वेनस्टायगर २०१४ च्या जर्मनीच्या फुटबॉल वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य होता.
२०१६ मध्ये युरो कपच्या उपांत्यफेरीत जर्मनीचा पराभव झाल्यानंतर त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते. बार्यन म्युनिच क्लबच्या या माजी स्टार फुटबॉलपटूने सोशल मिडीयावरुन निवृत्तीची घोषणा केली. भविष्यातील जर्मनीच्या सामन्यासाठी माझा विचार करु नका. मला आता थांबायचे आहे असे मी जर्मन फुटबॉल संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकांना कळवले आहे.
चाहते, संघ, प्रशिक्षक मी सर्वांचे आभार मानतो असे फेसबुक पोस्टमध्ये श्वेनस्टायगरमध्ये म्हटले आहे. १२० सामन्यात मला देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. ते क्षण खूप आनंददायी होते असे श्वेनस्टायगरने म्हटले आहे.